शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आपणही चव्हाणांची पायताणे उचलली

By admin | Updated: June 17, 2016 00:22 IST

रणजितसिंह देशमुख यांचा टोला : आमदारांनी जुनीच चाके घेऊन पळावे

मायणी : ‘गाडीची चाके उगळून जुनी झाल्यावर फेकून देण्यात येतात. नवी चाके लावल्याशिवाय विजयश्री मिळविता येत नाही. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांनी आता विजय मिळविला असून, आता आमदारांनी जुनी चाके व हातात काठी घेऊन रस्त्यावर पळण्याशिवाय पर्याय नाही. आपणही पृथ्वीराज चव्हाण यांची पायताणे उचलत होता, हे विसरू नका,’ असा टोला शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना नाव न घेता लगावला.निमसोड, ता. खटाव विकास सेवा सोसायटीवर रणजितसिंह देशमुख यांच्या विचारांच्या सर्व १३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे ही सोसायटी देशमुख यांच्या ताब्यात राहिली आहे. यानिवडीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब घाडगे, चंदू घाडगे, दिगंबर देशमुख, बजरंग देशमुख, महादेव घाडगे, नीलेश घार्गे, अशोक घाडगे, नामदेव घाडगे, शिवाजी देशमुख, मोहन देशमुख, अनिल भगत, परेश जाधव, अण्णासाहेब शितोळे, शरद शितोळे, धनाजी कदम आदी उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘माण-खटाव तालुक्यांत पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे आली आहेत. जलसंधारण आणि येरळा, माणगंगा नदी पुनरुज्जीवनाची कामे सुरू आहेत. त्यामुळे पावसाळ्यात याच कामामुळे या तालुक्यांचे चित्र पालटताना दिसून येणार आहे. तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी संपविण्यासाठी पालकमंत्र्यांचे पायताणे उचलू नाही तर त्यांची मिरवणूक काढू. याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. यापूर्वी आपणही पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री असताना पायताणेच उचलण्याचे काम केले होते, हे आता विसरू नका,’ असा सल्लाही यावेळी देशमुख यांनी दिला. या निवडणुकीत भीमराव घाडगे, सुभाष देशमुख, अंकुश घाडगे, अभिजित देशमुख, महादेव माने, दादासाहेब शितोळे, किसन कदम, उत्तमराव देशमुख, महादेव तामखडे, जयसिंग तावरे, तानाजी पवार, गंगूबाई देशमुख, शांताबाई देशमुख हे बिनविरोध निवडून आले आहेत. (वार्ताहर) सोसायटी देशमुख यांच्या ताब्यात...निमसोड सोसायटी निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामुळे सोसायटी निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. ही सोसायटी शिवसेनेचे देशमुख यांच्या गटाच्या ताब्यात गेली आहे.