शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी योगा, दुपारी झोपा ! सरकारी कर्मचारी थकले :

By admin | Updated: June 22, 2016 00:06 IST

योगामुळे दिवसभरच्या कामावर परिणाम; शासकीय कार्यालयातील स्थिती, बातमीनंतरची बातमी

कऱ्हाड : बारा महिने आरामदायी खुर्चीवर बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अचानक योगासने करायला लावल्यास त्यांची अवस्था काय होईल. किंवा सवय नसतानाही योगासने करण्याची वेळ आल्याने त्याचा कशाप्रकारे कामावर परिणाम होतो. याची प्रचीती मंगळवारी येथील पंचायत समिती, पालिका कार्यालयातील शासकीय विभागातील अधिकाऱ्यांकडे पाहिल्यास आली. सवय नसतानाही योगासने केल्यामुळे काही अधिकारी दिवसभर कार्यालयात डुलक्या तर काहीजण थकलेल्या अवस्थेत दिसून आले. आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिवस मंगळवारी सकाळी येथील शासकीय कार्यालये, पंचायत समिती, पालिका तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. योगासने केल्याने शरीरास उत्तम आरोग्य लाभते. अनेक रोगांपासून सुटका मिळते. म्हणून सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी या दिवशी योगासने करणे बंधनकारक असल्याचे सांगत संबंधित विभागांना तसे शासनाच्या वतीने आदेशही देण्यात त्याबाबतच्या नोटिसाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्या विभागांना पाठविण्यात आलेल्या होत्या. या योगदिनानिमित्ताने योगासनाचे महत्त्व वाढण्यास मदत होईल हा उद्देश ठेवून योगदिन मंगळवारी सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्यात आला.योगासनांमध्ये करण्यात येणाऱ्या आसनांना मोठे महत्त्व असते. कारण त्यांच्यानुसार शरीराचा व्यायाम करणे गरजेचे असते. नाहीतर शारीरिक व्याधीही होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या योगासनांच्या प्रकाराची पुरेशी माहिती काहींना नसल्याने त्यांना योगासन केल्यामुळे त्रासही जाणवू लागला. ओबड धोबड शरीरामुळे काहींची व्यायाम करताना चांगलीच फजिती उडाली. तर काहींजण दिवसभर सुस्त अवस्थेत दिसून आले.येथील पंचायत समिती कार्यालयात तर अनेक अधिकाऱ्यांचे चेहरे सुकलेले तर काहीजण थकलेल्या अवस्थेत दिसून आले. बारा महिने खुर्चीवर बसून संगणकावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अवस्था ही सकाळी योगासने करून दिवसभर काम केल्यामुळे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. नियमित कामाची सवय असल्यामुळे अशा प्रकारचा योगदिन नियमित घेण्यात यावा, असे काहींनी सांगितले तर काहीजणांनी असा योगदिन नको रे बाबा ! असे सांगितले. तसे पाहिले तर शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आरोग्याच्या दृष्टीने फीटच असणे गरजेचे आहे. त्यामुळे याचा ताण कामावर येत नाही. जर आजारी असल्यामुळे कामावर जास्त प्रमाणात ताण येतो. म्हणून नियमित योगासने करणे गरजेचे आहे; पण अचानक योगासने केल्यामुळे काय फजिती होते, याचा प्रत्यय मंगळवारी अधिकाऱ्यांना आला. (प्रतिनिधी)कार्यालये दिवसभर सामसूम !सकाळी योगासने करून दिवसभर कामावर हजर राहण्याची सक्ती केल्यामुळे अनेकांनी कामाचे निमित्त काढून कार्यालयातून बाहेर पडले. त्यामुळे पंचायत समिती, पालिका तसेच इतर शासकीय कार्यालयात दिवसभर अधिकारीच नसल्याने नागरिकांना परत जावे लागले. मात्र, अधिकारीच गेले कुठे, आज सर्वत्र शांतता कशी काय पसरलेली आहे. याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात होती. तर अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यालये ओस पडलेली दिसून आली.