शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘योगा’नं फुलला सातारकरांचा श्वास!

By admin | Updated: June 22, 2016 00:16 IST

जागतिक योग दिवस : जिल्हाधिकारी अन् पोलिस अधीक्षकांसह हजारो कर्मचाऱ्यांची हजेरी; शाळांमधील शिबिरांमध्ये लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग

सातारा : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित शिबिरांत शेकडो अधिकारी, कर्मचारी तसेच शाळांमधून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालयाचा आयुष विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि ईशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, ‘आयुष’च्या डॉ. संजीवनी शिंदे, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, डॉ. उज्ज्वला माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे उपस्थित होते.करमणूक केंद्र पाटबंधारे विभागात श्री अंबिका योग कुटीर, ठाणे शाखा साताराच्या वतीने, पोलिस मैदान येथे आॅर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने योग प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य कार्यक्रमाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्वामी नंदका, योगेश गाडगीळ, तिलोक बोहरा, मंगेश इनामदार, सुमित हवालदार, श्रीधर एल.व्ही यांनी प्रात्यक्षिके करून प्रशिक्षण दिले. प्राणायाम, विविध योगासने यांचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्काऊट गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हा कारागृहात बंदीजनांची योगासनेजिल्हा कारागृहात श्री अंबिका योग कुटीरचे प्रशिक्षक राजेंद्र तांबे, रवींद्र चक्के, डॉ. राजेश शिंदे, सतीश कोळवणकर यांनी बंदीजनांना प्राणायाम, योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले. प्रार्थनेने सुरुवात करून शांतीपाठाने योगाभ्यासाचा समारोप केला. यावेळी प्रभारी कारागृह अधीक्षक एम. के. अवघडे यांनी मार्गदर्शन केले. तुरुंगाधिकारी निवृत्ती गवळी यांनी प्रास्ताविक केले. काही तरुणांनी बागा, अजिंक्यतारा, चारभिंती, यवतेश्वरच्या डोंगरावर जाऊन योगा केला. हा क्षण त्यांनी मोबाईलवर सेल्फी काढून बंदिस्त केला. या तरुणांमध्येही कमालीचा उत्साह जाणवत होता.योगा दिनाच्या निमित्ताने असंख्य शाळांचे मैदान सकाळीच विद्यार्थ्यांनी फुलले होते. खेळाचे कपडे घालून आलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. काही शाळांनी विद्यार्थ्यांसाठी पाणी, नाष्ट्याची सोय केली होती.