शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

होय.. मी माण, खटावमधील जनता अन् पाण्याचा पुजारीच: जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:51 IST

दहिवडी : ‘होय, मी माण आणि खटावच्या स्वाभिमानी जनतेचा आणि मतदारसंघात येणाऱ्या पाण्याचा पुजारीच आहे. मला त्याचा अभिमानही आहे. ...

दहिवडी : ‘होय, मी माण आणि खटावच्या स्वाभिमानी जनतेचा आणि मतदारसंघात येणाऱ्या पाण्याचा पुजारीच आहे. मला त्याचा अभिमानही आहे. पिंगळी तलाव कालव्याची वर्क आॅर्डर आघाडीच्या कार्यकाळातील सप्टेंबर २०१४ मधील आहे. त्यापूर्वीच या कामाचे टेंडर झाले होते. उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात आणायला या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामुळे डिपॉझिट जप्त झालेले आणि दुकानदारीसाठी मंत्रालयात खेटे घालणारे ट्रस्टी होऊच शकत नाहीत,’ असा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी केला.माण तालुक्यातील पिंगळी तलावात पोहोचणाºया उरमोडीच्या पाण्याचे यादव मळा येथे पूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, एम. के. भोसले, अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, नगराध्यक्षा साधना गुंडगे, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, धनाजी जाधव, काँग्रेसच्या नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.आ. गोरे म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांपूर्वीच मी उरमोडीचे पाणी माण तालुक्यात आणले आहे. लबाड आणि दुकानदारी करणाºया विरोधकांनाही ते माहीत आहे. आमदारकीचे डोहाळे लागलेल्यांना फोटोची भारी हौसआहे, मात्र कॅनॉल आणि आलेले पाणीच कुठे आहे, हे त्यांनामाहीत नाही. माझ्या मतदारसंघासाठी पाणी हा जीवन मरणाचा प्रश्नआहे. त्याची चेष्टा करू नका. एकदा समोरासमोर या. पाणीयोजनांसाठी कुणी काय केले, ते जनतेसमोर मांडू.’विरोधकांची हौस पुरवू...उरमोडीच्या पाण्यामुळे दहिवडीसह परिसराचा पाणीप्रश्न काहीअंशी हलका होईल; पण मी जिवंत आहे तोपर्यंत विविध योजनांचे शाश्वत पाणी आणणारच आहे. मी आणलेल्या पाण्याचे पूजन करण्याची विरोधकांची हौस कायमच पुरविली जाणार आहे, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला.