शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

येरे येरे पावसा... मालात गुंतलाय पैसा!

By admin | Updated: June 23, 2016 01:43 IST

जिवाला घोर : उधारीवरील हंगामी व्यवसाय अडचणीत

सातारा : हंगामी व्यावसायिक हे ऋतूंवरील बदलानुसार आपला व्यवसाय करीत असतात. सध्या मान्सून सुरू आहे. यामुळे हंगामी व्यावसायिकांनी उधारी, कर्जावर पावसाळी माल उचलला आहे. परंतु अद्यापही पाऊस न पडल्याने हंगामी व्यावसायिकांच्या मालाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. गुंतविलेला पैसा वेळेत परत न केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे येरे येरे पावसा मालात गुंतलाय पैसा अशी म्हणायची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे.मे महिन्यापासूनच हवामान खात्यामार्फत यंदा पाऊस चांगला राहणार व वेळेच्या आधी सुरू होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पैशांची जुळवाजुळव करत पावसाठी छत्री, रेनकोट, जर्किन, प्लास्टिक कागद, ताडपत्री, बुटचप्पल अशा विविध वस्तुंमध्ये पैसे गुंतवले आहेत. परंतु अद्यापही पावसाची सुरुवात झाली नसल्याने या व्यावसायिकांचा माल पडून आहे. यामधील काही व्यावसायिकांनी व्याजावरही पैसे उचलून मालात गुंतवणूक केली आहे. साधारणत: हंगामी व्यावसायिक एक किंवा दोन महिन्यांच्या के्रडिटवरच माल उचलतात. परंतु मान्सून सुरू होऊन देखील पाऊस पडत नसल्याने या व्यावसायिकांना पैसे परत करण्याची धास्ती लागून राहिली आहे.पावसाळा सुरू होताच छत्री, रेनकोट, जर्किन हा व्यवसाय तेजीत राहतो. यातून उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे व्यावसायिक यामध्ये लाखो रुपये गुंतवितात. मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडला नाही. यंदा मात्र प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने व्यावसायिकांनीही गुंतवणूक केली आहे. परंतु पावसाअभावी हा माल आजही पडून राहिला असल्याने व्यावसायिकांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. (प्रतिनिधी)आम्ही मोठ्या व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल खरेदी करतो. पाऊस झाला नाही तर पावसाळ्यासाठी लागणाऱ्या छत्र्या, रेनकोट खपणार नाहीत. हा माल आमच्याकडून पडून राहिल्यास याचे पैसे परत कसे करणार ही चिंता पडली आहे.-सलमान बागवान, हंगामी व्यावसायिक