शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

येळगावकरांचा राष्ट्रवादीला रामराम

By admin | Updated: July 6, 2014 23:25 IST

भाजपमध्ये जाणार : लवकरच करणार घोषणा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘राम-राम’ करण्याचा निर्णय घेतला. मायणी येथे त्यांची निवडक विश्वासू कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर ते या निष्कर्षाप्रत आले. तीनच दिवसांपूर्वी डॉ. येळगावकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन माण विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे स्पष्ट करतच ‘जनता हाच माझा पक्ष’ असे जाहीरपणे सांगितले होते. त्याचीच प्रचिती रविवारी आली.डॉ. येळगावकर रविवारी दिवसभर मायणीमध्ये होते. यावेळी त्यांनी निवडक दोनशे कार्यकर्त्यांसमवेत आगामी राजकीय वाटचालीबाबत चर्चा केली. या बैठकीस सुरेशशेठ शिंदे, श्रीमंत पाटील, बाबा गोसावी, सचिन माळी, संभाजी इंगळे, संजय इनामदार, विकल्प शहा आदी उपस्थित होते.या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठ्या अपेक्षेने आपण राष्ट्रवादीत गेलो असलोतरी पाणीप्रश्नावर आपली निराशा झाली असल्याचे ठामपणे सांगितले. पाणीप्रश्न सोडवायचा असेलतर आपल्याला पुन्हा भाजपला जवळ करावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनंतर डॉ. येळगावकर यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेत राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेशाच्या अनुषंगाने मेळावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)