शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘कमळाच्या झटक्यात’ येळगावकर लटकले !

By admin | Updated: August 5, 2014 23:41 IST

एकाच वेळी ‘मोठा बॉम्ब’ : थोडे थांबण्याचा दिला गेला सल्ला

सातारा : राष्ट्रवादी सोडून भाजपवासी होण्यासाठी निघालेले माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना अजूनही राज्य पातळीवरील नेत्यांच्या ‘हॉटलाइन’ची प्रतीक्षा लागून राहिली आहे. राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांशी येळगावकर यांनी स्वत:हून संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांना ‘अजून थोडे थांबा. आपण पश्चिम महाराष्ट्रात एकदाच मोठा झटका देऊ,’ असे सांगून थांबविले आहे. परिणामी येळगावकर आता भाजपच्या नेत्यांच्या निरोपाचीच प्रतीक्षा करत बसले आहेत.तीन दिवसांपूर्वी भाजपच्या राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी सातारा येथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, जाता-जाता भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यांनी काँग्रेसबरोबरच डॉ. दिलीप येळगावकरांचीही गोची करून टाकली आहे. काँग्रेसला तर खास माजी आमदार मदन भोसले यांच्यासाठी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट कारवी लागली. येळगावकर मात्र राज्यपातळीवरील नेत्यांवर हवाला ठेवून जिल्ह्यात फिरत आहेत.राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. दिलीप येळगावकर यांच्यावर राष्ट्रवादीकडून कमी-अधिक प्रमाणात टीका झाली. मात्र, त्यांनी या टीकेला उत्तर काही दिले नाही. याचवेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आ. गिरीश बापट, आ. पंकजा मुंडे-पालवे, विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली आहे. यापैकी काहीची त्यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, यापैकी प्रत्येक नेत्यांनी त्यांना ‘वेट अँड वॉच’ असाच सल्ला दिला आहे. येळगावकर यांनी माणमधून विधानसभा लढणार असल्याचेही पक्षाच्या नेत्यांसमोर स्पष्ट केले आहे. भाजपने यावेळी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा निर्धार केला आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांत काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज चेहऱ्यांच्या हाती ‘कमळ’ कसे देता येईल, यासाठी रणनीती आखली आहे. येळगावकर यांनी ज्यावेळी राज्य पातळीवरील भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांना याची कल्पना देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकाचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप झटका देण्याच्या तयारीत आहे. पुन्हा भाजपवासी होण्यासाठी निघालेल्या येळगावकर यांना थांबावे लागले आहे. (प्रतिनिधी) भाजपच्या वाट्याला किती मतदारसंघ..?सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी भाजपच्या वाट्याला माण, सातारा आणि कऱ्हाड दक्षिण हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. पाटण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, फलटण हे मतदारसंघ शिवसेना लढली होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार आहे, याविषयी कोणतीही शंका नाही. भाजपच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची मागणी झाली आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही काही विधानसभा मतदार संघाची मागणी पुढे रेटली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा विचार करता महायुतीत जागावाटपाचे त्रांगडे निर्माण होणार आहे. परिणामी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या एकूण आठ विधानसभा मतदारसंघापैकी भाजपच्या वाट्याला किती मतदारसंघ येणार याचीच आता साऱ्यांना प्रतीक्षा आहे.माझे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी वारंवार बोलणे होत आहे. माझी भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आहे. त्यांनीही हिरवा कंदील दिला आहे. आता फक्त वेळेची वाट पाहतोय. लवकरच त्याचाही निर्णय होईल. तोपर्यंत थांबणे भाग आहे.- डॉ. दिलीप येळगावकर,माजी आमदार, खटाव