शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव यांनीही साजरी केली होती सैनिकांसोबत दिवाळी

By admin | Updated: November 2, 2016 00:07 IST

पंतप्रधान मोदी यांचा सीमेवरील दिवाळीच्या फोटोबरोबर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही सीमेवरील सैनिकांबरोबरील दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले.

कऱ्हाड : काश्मीरच्या सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. दररोज एखादा दुसरा भारतीय जवान शहीद झाल्याची बातमी कानावर येत आहे. अशा परिस्थितीत सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली अन् लाखो भारतीयांना माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आठवण आली. पंतप्रधान मोदी यांचा सीमेवरील दिवाळीच्या फोटोबरोबर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही सीमेवरील सैनिकांबरोबरील दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले. सध्या पाकिस्तान बरोबर चीनने देखील भारताविरोधातील आपल्या कुरापती वाढविल्या आहेत. सीमेवरील खडाजंगीत भारतीय जवान शहीद होताना पाहायला मिळत आहेत. उरी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. मात्र, त्यांचे वीरमरण वाया न जाऊ देता ‘सर्जिकल स्ट्राईक’ च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी त्याला चोख उत्तर दिले. मात्र, तरीही शेजारील काही राष्ट्रांकडून कुरघोड्या थांबलेल्या दिसत नाहीत. अशावेळी सैनिकांचे मनोबल, मनोधैर्य वाढविणे अत्यावश्यक आहे. तीच बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी आपली दिवाळी चीनच्या सीमेवर सैनिकांबरोबर साजरी केली. ही बाब कौतुकाची आहे. अशावेळी ‘हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ या काव्यपक्ती ज्यांच्यासाठी गायल्या जातात. त्या यशवंतराव यांची आठवण प्रकर्षाने होते. १९६२ मध्ये भारताला अपमानास्पद परिस्थितीत सीमेवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळची राजकीय परिस्थितीही अस्थिर होती. निर्णय क्षमतेचा अभाव जाणवत होता. तेव्हा पंतप्रधान असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले कऱ्हाडच्या सुपुत्राला संरक्षणमंत्री म्हणून बोलावले. हाकेला साथ देत चव्हाण हे संरक्षणमंत्री म्हणून कामाला लागले. पराभवाची कारण मिमांसा शोधली. त्रुटींचा आढावा घेतला. अन् सैन्य दलाच्या पुनर्गठणानंतर सक्षम संरक्षणदल उभे करण्याचे काम केले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी देखील असेच सीमेवर जाऊन सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली होती. नरेंद्र मोदी तीच वाट चोखाळत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मनोबल वाढविण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदींबरोबर यशवंतराव यांचे सैन्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून केलेले काम, घेतलेले निर्णय खरच इतरांच्या अभ्यासासाठी योग्य आहेत. त्यांनीही संरक्षणमंत्री असताना सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. - मोहनराव डकरे, सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, कऱ्हाड