शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

येळगावकरांची गोची.. नाचता येईना; मांजर आडवे!

By admin | Updated: August 22, 2014 22:06 IST

भाजपप्रवेश टांगणीला : ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अवस्थेमुळे कायकर्ते अस्वस्थ

सातारा : राष्ट्रवादीला रामराम करून बाहेर पडलेल्या दिलीप येळगावकर यांच्यासाठी भाजपप्रवेश म्हणजे ‘नाचता येईना... मांजर आडवे’ असेच झाले आहे. माझ्या प्रवेशाला काळी मांजरे आडवी येत असल्याचे सांगून त्यांना कोणावर निशाणा साधायचा होता, हे जिल्ह्यातील पक्षनेत्यांनाही उमगलेले नाही. मात्र, ही ‘काळी मांजरे’ त्यांच्याच माण, खटाव तालुक्यांतील असल्याची चर्चा आहे. येळगावकरांनी राष्ट्रवादी सोडून दोन महिने संपत आले तरी भाजपकडून त्यांना प्रवेश देण्याबाबत अजून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी घेतलेले विनोद तावडे यांच्या दौऱ्यातही येळगावकर दिसले नाहीत. त्याबाबत तावडेंना विचारणा झाली असता त्यांनीही निरुत्साही होतच उत्तर दिले.येळगावकरांचा दि. ११ आॅगस्ट रोजीच भाजपप्रवेश होणार होता. मात्र, तो झाला नाही. यानंतर अशी माहिती पुढे आली की, येळगावकरांना भाजपकडून ‘कोणतातरी शब्द’ तर हवा आहेच. त्याचबरोबर त्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे-पालवे उपस्थित हव्या होत्या. परिणामी ही प्रक्रिया रखडली. माण मतदारसंघ ‘रासप’कडे राहील, अशीही चर्चा पुढे आली आणि येळगावकरांची गोची झाली. राष्ट्रवादीही सोडली आणि भाजपमधूनही प्रतिसाद मिळेना, अशा कात्रीत ते सापडले आहेत.येळगावकरांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर महिन्यात माण-खटाव भाजपची दहिवडीत गुप्त बैठक झाली आणि येळगावकरांना विरोध करणारा ठराव झाला. त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, अशी मागणीही झाली. त्या ठरावाची प्रत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आली आहे. येळगावकर ज्या पक्षातून आमदार झाले, त्याच पक्षाला त्यांनी राष्ट्रवादीत जाताना असभ्य भाषा वापरली होती, असा उल्लेख या ठरावात असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)