वाई : येथील मॉडर्न क्लिनिक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा ज. नी. अभ्यंकर स्मृती वाई वैद्यक भूषण पुरस्कार यंदा वाईतील अतिदक्षता तज्ज्ञ डाॅ. विद्याधर घोटवडेकर यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे सदस्य, इंडियन मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, जीपी असोसिएसन आणि मागील पुरस्कार विजेत्या व्यक्तींच्या समितीने ही निवड केली.
पंचवीस वर्षे व्रतस्थपणे भूलशास्त्रतज्ज्ञ म्हणून केलेले कार्य, अतिदक्षता विभागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या असाधारण उपचार व कोरोना काळातील निरलस सेवा लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर केला. ११ हजार रुपये रोख, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. शरद अभ्यंकर, डॉ. विलास परामणे, डॉ. मनोहर दातार, डॉ. शेखर कांबळे, डॉ. शैलेंद्र धेडे, डॉ. प्रशांत पोळ, डॉ. योगेश फरांदे यांनी त्यांच्या नावाला संमती दिली. पुरस्कार वितरण प्रख्यात अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. समीर जोग यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाची वेळ आणि तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टचे सचिव डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी दिली. (वा. प्र.)
१७विद्याधर घोटवडेकर