सातारा : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी रविवारी (दि. १९) निश्चित केलेल्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रात चौदा टेबल मांडले असून, मतदारसंघनिहाय फेऱ्या सरासरी २२ ते ३२ आहेत. पोस्टल मतांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र टेबल आहेत. मतमोजणी कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात आठ मतदारसंघांसाठी बुधवारी (दि. १५) मतदान झाले. एकूण ८७ उमेदवार रिंगणात होते. रविवारी (दि. १९) मतमोजणी होणार असल्यामुळे प्रशासन सज्ज आहे. सकाळी आठ वाजता प्रत्येक मतमोजणी केंद्रात मोजणीला सुरुवात होणार आहे. प्रथम पोस्टल मतदान मोजण्यात येणार आहे. याची घोषणा झाल्यानंतर पहिल्या फेरीला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एखाद्या मशीनवरील निकाल प्रदर्शित होत नसेल, तर निवडणूक आयोगाने पाठविलेल्या अभियंत्यांकडे असलेला निकाल प्रदर्शित करण्याची पर्यायी यंत्रणा जोडून निकाल प्रदर्शित करण्यात येणार आहे. अथवा मशीनला प्रिंंटर जोडूनही निकालाची प्रत काढता येणार आहे. एवढे करूनही काही वेळा निकाल प्रदर्शित होत नसेल, तर आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले.कडेकोट बंदोबस्तजिल्ह्यात सर्व आठ विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रात ज्या स्ट्राँगरूममध्ये मतदान यंत्रे (इव्हीएम) ठेवले आहेत, तेथे कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षाव्यवस्था पुरविली आहे. सर्व मतदारसंघाच्या स्ट्राँगरूम सुरक्षेसाठी सशस्त्र सेना दलाच्या दोन कंपन्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या, आसाम येथील ‘आरपीएसएफ’च्या दोन प्लाटून याप्रमाणे साडेचार कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी सातारा पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक अथवा पोलीस उपनिरीक्षक, ४९ पोलीस कर्मचारी तसेच बाहेरून आलेल्या कंपन्यांपैकी एक प्लाटून व तीन सेक्शन नेमण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)मतदारसंघटेबलफेऱ्यावाई१४३२सातारा१४३0पाटण१४२९माण१६२६फलटण१४२५कोरेगाव१४२४कऱ्हाड दक्षिण१४२४कऱ्हाड उत्तर१४२२
वाई, साताऱ्यात सर्वाधिक फेऱ्या
By admin | Updated: October 17, 2014 23:54 IST