शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला उच्चांकी २९ हजार प्रतीक्विंटल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:36 IST

वाई : वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवार दि. २ रोजी झालेल्या हळद लिलावामध्ये मोहन ओसवाल यांच्या काट्यावर बावधन ...

वाई : वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवार दि. २ रोजी झालेल्या हळद लिलावामध्ये मोहन ओसवाल यांच्या काट्यावर बावधन येथील प्रगतशील शेतकरी गणेश विश्वास कदम यांनी कष्टातून पिकविलेल्या हळद पिकाला २९ हजार इतका उच्चांकी दर मिळाला. भुईंज येथील शेतकरी संदीप ज्ञानेश्वर भोसले यांच्या हळदीला २५ हजार इतका उच्चांकी दर मिळाला.

बाजार समितीत सरासरी दोन हजार पोत्यांची आवक होऊन त्यातील सरासरी दर ९ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. अशा उच्चांकी दराने वाई येथे हळदीचे लिलाव झाल्यामुळे वाई तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. वाई तालुका हा सातारा जिल्ह्यामध्ये हळदीचे आगार म्हणून ओळखला जातो. ओझर्डे, पांडे, खानापूर, फुलेनगर, बावधन, भुईंज, शिरगाव, कवठे, व्याजवाडी येथील प्रगतशील शेतकरी पिढ्यानपिढ्या हळद पिकांचा वाण जपण्यासाठी प्रसंगी सोसायटी, खासगी सावकार व हातउसने व घरातील दागिने गहाण ठेवून हजारो रुपयांचे शेणखत व हळद पीक उत्पादनासाठी इतर एकरी ४० हजार रुपयांच्या आसपास खर्च करीत असतात.

त्याचबरोबर शेतीची मशागत, रासायनिक खत व उत्तम प्रतीची बियाणी मिळविण्यासाठी असा लाखो रुपये खर्च करून स्पर्धात्मक हळदीचे पीक घेताना दिसून येतात. पण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून राज्यातील सर्वच बाजार समितींच्या काट्यावर क्विंटलला ४ ते ५ हजार रुपये दर प्राप्त होत होता. त्यावेळी शेतकरी नाराज होऊन कवडीमोल दराने आपल्या हळदीची विक्री करीत होता. पण आजपर्यंत हळद शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतानाही शेतकऱ्यांनी हळदीचा बिवड जपून ठेवल्याने त्याला ९ हजार रुपयांपासून २९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू लागला. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. तरी वाई तालुक्यासह परिसरातील तालुक्यातील शेतकऱ्यांनी हळद पिकाला जादा दर मिळविण्यासाठी वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा व शेतकऱ्याने जास्तीत जास्त दर आपल्या पदरात पाडून घ्यावा, असे आवाहन वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती व सर्व संचालकांनी केले आहे़.