शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

कुस्ती पाटणची; मैदान कऱ्हाडच

By admin | Updated: July 22, 2014 22:13 IST

राजकीय गट सक्रिय : पाटण तालुका कऱ्हाड रहिवासी मित्रमंडळ कार्यरते

प्रमोद सुकरे - कऱ्हाडपाटण विधानसभा निवडणूक म्हटलं की ‘काँटे की टक्कर’ डोळ्यासमोर येते. या मतदारसंघातील सुमारे १५ हजार मतदार कऱ्हाड शहर व परिसरात आहेत. या मतदारांना आपलसं करण्यासाठी संभाव्य उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे. देसाई आणि पाटणकर गटाच्या समर्थकांनी येथे ‘पाटण तालुका कऱ्हाड रहिवासी मित्र मंडळ’ कार्यरत केले असून नेत्यांचा राबता वाढल्याचे दिसत आहे. कऱ्हाड आणि पाटण तालुक्याचा संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिला आहे. याच तालुक्यातून आलेल्या कोयना नदीचा कृष्णेशी प्रीतीसंगम कऱ्हाडातच झाला आहे. कोयना धरणाच्या उभारणीनंतर काही विस्थापीत गावांचं पुनर्वसन याच तालुक्यात झालं, शिवाय नोकरी, व्यवसाय, उद्योग धंदा, शिक्षण आदी कारणांमुळे अनेक पाटणकरांनी कऱ्हाडात राहणं पसंत के लंय शहरात पाटण कॉलनी नावाची जुनी एक कॉलनीही त्यांची साक्ष देते़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं निवासस्थान याच कॉलनीत आहे़ पुनर्वसन झालेल्या गावातील लोक आता पक्के कऱ्हाडकर झाले आहेत़ त्यांचे रेशनिंग कार्ड अन् मतदारयादीही कऱ्हाडची आहे; पण काही कामानिमित्त कऱ्हाडात परिवारासह राहणारे पाटण तालुक्यातील सुमारे पाच हजार मतदार कऱ्हाडात आहेत़ ढेबेवाडी परिसरातून आलेले लोक विजयनगर, विमानतळ परिसरात राहतात. शिक्षणासाठी आलेल्यांनी विद्यानगर परिसरात राहणे पसंत केले़ इथं घरे बांधली पण त्यांची मनं पाटणकडेच आहेत़ पाटण विधानसभेच्या काही लढती पाहिल्या तर पाचशे हजाराच्या फरकाने झाल्यात. त्यामुळे कऱ्हाडात राहणारे ५ हजार मतदार त्यांच्यासाठी अमूल्य आहेत़ गत विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर शंभूराज देसाईंनी ही गोष्ट ओळखली अन् सुमारे ३ वर्षापूर्वी अ‍ॅड़ मिलींद पाटील यांनी पाटण तालुका कऱ्हाड रहिवाशी मित्र मंडळ कार्यरत केले़ गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, स्नेहमेळावा यांच्या माध्यमातून साखर पेरणी झाली़ गत वर्षी जरा उशिराच विक्रमसिंह पाटणकर यांनीही तोच कित्ता गिरवत माजी उपसभापती रमेश मोरेंच्या माध्यमातून असेच एक स्वतंत्र मित्रमंडळ कार्यरत केले आहे़ अन् विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या मतदारांना आपलसं करण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत़ त्यामुळे निवडणूक पाटणची असली तरी तयारी कऱ्हाडात सुरू झाल्याचे दिसत आहे़---सन २००९ पर्यंत पाटण तालुक्यातील कुंभारगाव जिल्हा परिषद मतदार संघ कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ पाटणमध्येच राहिलाा; पण कऱ्हाड तालुक्यातील सुपने, तांबवे जिल्हा परिषद गट पाटण विधानसभेला जोडण्यात आलाय. १० हजारावर जास्त मतदार या गटात असल्याने पाटणच्या निकालाच्या चाव्या कऱ्हाडकरांच्या हातात आहेत.राजकीय साटेलोटयाकडेही लक्ष !----राजकारण, निवडणूका आल्या की मदतीची देवाण घेवाण आलीच ! कुंभारगाव गट कराड दक्षिणेत असताना पाटणचे नेते कऱ्हाडकरांना मदत करत होते़ आता सुपने-तांबवे गट पाटण मध्ये असल्याने परतफेड करण्याची संधी कऱ्हाडच्या नेत्यांवर आली आहे़ कोण कशी परतफेड करतय हे पाहण्यासाठी थोड थांबावच लागेल़