शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच आरतीने गणपती अन् ताबुताची पूजा, साताऱ्यातील राजवाडा येथे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:01 IST

सातारा शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता.

ठळक मुद्देएकाच आरतीने गणपती अन् ताबुताची पूजा, साताऱ्यातील राजवाडा येथे भेट हिंदू-मुस्लीम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन; भाविकांची गर्दी

सातारा : शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता.हिंदू-मुस्लीम बांधवांचे ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहरमला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ताबुतांच्या पंजांची स्थापना करण्यात आली. मंगळवारी मोहरम महिन्याच्या दहाव्या दिवशी भावपूर्ण वातावरणात शहरातून ताबूत व पंजांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.साताऱ्यातील जंगीवाडा येथील जंगीसाहब या ताबुताला १५० वर्षांपूर्वीची मोठी परंपरा आहे. या ताबुताच्या दर्शनासाठी जिल्ह्याबाहेरून भाविक येत असतात. मौलाअली, कवडी पीर, बेबी फातिमा, घोडे पीर आदी ताबुतांची स्थापना शहरातील विविध भागांमध्ये करण्यात आली होती. सोमवारी कत्तल की रात या दिवशी मानवी वाघांची मिरवणूक काढण्यात आली होती. या वाघांनी ताबूत व पंजांची भेटी घेतल्या. या भेटी पाहण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती.इस्लामी नववर्षाची सुरुवात मोहरम महिन्याने होते. नवव्या व दहाव्या दिवशी अनेक मुस्लीम बांधव ऐच्छिकपणे रोजा धरत असतात. मिरवणुकीनंतर गरिबांना दानधर्म आणि अन्नधान्य देण्याची मुस्लीम बांधवांमध्ये प्रथा आहे. त्यानुसार अनेक मुस्लीम बांधवांनी मिरवणुकीनंतर शेवटी गरीब लोकांना अन्नदान तसेच सरबताचे वाटप करण्यात आले.अनेक मंडळांकडून स्वागत..मागील वर्षापासून गणपती व मोहरम सण एकत्र येत असल्याने अनेक ठिकाणी ताबूत व गणपतीची एकाच ठिकाणी स्थापना करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळते. विसर्जनादिवशीही अनेक ठिकाणी विविध मंडळांनी विसर्जन मिरवणुकीतील ताबूत, पंजांचे स्वागत केले. त्यामुळे ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSatara areaसातारा परिसरMuslimमुस्लीम