शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांनी कंपनीला सहकार्य करावे

By admin | Updated: November 22, 2014 00:20 IST

वाई : उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन

वाई : ‘उद्योग चालले तरच कामगारांचा उदरनिर्वाह होईल, त्यासाठी कामगारांनीही कंपनी व्यवस्थापनास सहकार्य करावे. तरच हे उद्योग जगू शकतात,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.येथील औद्योगिक वसाहतीतील गरवारे कंपनीच्या सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप केला होता. याप्रसंगी शिवप्रताप माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांनी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन व्यवस्थापनास दिले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विजयसिंह नायकवडी, काशीनाथ शेलार, विजया भोसले, महेंद्र धनवे, युनियनचे अशोक सावंत, रणजित माने, विकास गाढवे, वहिवाटदार चंद्रकांत भोसले, अजय मांढरे, गरवारे कंपनीचे अधिकारी सुरेश वैद्य, वैभव जोशी आदी उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात गरवारे कंपनीतील कंत्राटी कामगार जमा झाले होते. यात महिला कामगारांचा मोठा सहभाग होता. दुपारी तीनच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले येथे आल्यानंतर त्यांनी कामगारांशी चर्चा केली. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन, असे सांगून प्रमुख कामगारांसह कंपनीत जाऊन व्यवस्थापनास मागण्यांचे निवेदन दिले. तसेच व्यवस्थापनाने संप केलेल्या कामगारांविषयी कोणताही आकस मनात बाळगू नये, त्यांना त्रास देऊ नये, त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे सांगितले. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही गरवारे कंपनीचे कंत्राटी कामगार असून, गेली पाच ते पंधरा वर्षे कंपनीत कार्यरत आहोत. तरीही आम्हास सुविधा मिळत नाहीत. आम्हाला शासकीय परिपत्रकानुसार पगारवाढ मिळावी, अपघात झालेल्या कामगारांना सुविधा मिळाव्यात, कँटिनमध्ये सुविधा व कूपनमध्ये सवलत मिळावी, सेवेप्रमाणे पगारवाढ व्हावी, कामगारांना संरक्षण साहित्य मिळावे, पी. एफ. मधील अडचणी दूर व्हाव्यात, पार्किंगमध्ये सुविधा मिळावी, बोनस संदर्भातील अडचणी दूर व्हाव्यात.’निवेदनावर कामगारांच्या सह्या आहेत. कामगारांमध्ये असंतोष असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, भुर्इंजच्या सहायक पोलीस निरीक्षक सोनिया गोसावी, पाचगणीचे बाळासाहेब भरणे, प्रकाश खरात व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)