शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रहाटाघर येथील वीज उपकेंद्राचे काम रखडले

By admin | Updated: October 1, 2014 21:27 IST

महावितरण कंपनी : पावसामुळे उपकेंद्र परिसरात पाणी

कार्वे : निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो़ यावर्षीही अवेळी व मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ काकडीसह सोयाबीनचेही दर गडगडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे़यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली़ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून बराच काळ लांबला़ परिणामी, शेतकऱ्यांची पेरणी, टोकणीचीही कामे खोळंबली़ शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली असली तरी पाऊसच नसल्याने टोकणी व पेरणीला खो बसला़ शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते़ बऱ्याच प्रतीक्षेनंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली़ त्यामुळे शेतकरी सुखावले़ त्यांची पेरणी, टोकणीची लगबग सुरू झाली़ मुसळधार पाऊस झाला नसला तरी संततधार सुरू राहिल्याने पिकांच्या पेरणी, टोकणीसाठी पोषक वातावरण तयार झाले होते़ अशातच पावसाचा मुक्काम लांबला़ त्यामुळे शेतात पाणी साचले़ सोयाबीनसह अनेक पिके पाण्याखाली बुडाली़ काकडीची फुलकळी झडली़ तसेच मुळ्याही कुजल्या़ त्याचा फटका उत्पन्नावर झाला़ शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही़ मोठ्या क्षेत्रातूनही अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले़ सुरुवातीला काकडीचा दर चांगला होता़ मात्र, काही दिवसांतच दर कमी झाला़ सोयाबीनचीही हीच अवस्था झाली़ अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून सोयाबीनची लागवड केली़ त्याला खत, पाण्याचे नियोजन केले़ मात्र, एवढे करूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकातून कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले़ (वार्ताहर)उत्पादनापेक्षा बियाणाचा खर्च तिप्पटजून, जुलै महिन्यांत सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना त्याचा दर पाहून शेतकऱ्यांना अक्षरश: घाम फुटला होता़ सोयाबीनच्या बियाणाचा दर प्रतिकिलो १०० रुपये एवढा होता़ म्हणजे बियाणाचा दर प्रतिक्विंटल दहा हजार रुपये होता़ मात्र, एवढे महाग बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला फक्त तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय़ व्यापारी शेतकऱ्यांकडून फक्त तीस रुपये किलोने सोयाबीन खरेदी करतायत़