शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-लातूर महामार्गाचे काम पुसेगावात रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:05 IST

पुसेगाव : ‘येथील प्रस्तावित रिंगरोडला शिवसेनेचा विरोध असून सातारा-पंढरपूर राज्यमार्ग हा गावातून झाला पाहिजे, रस्ता रुंदीकरण करताना मुख्य ...

पुसेगाव : ‘येथील प्रस्तावित रिंगरोडला शिवसेनेचा विरोध असून सातारा-पंढरपूर राज्यमार्ग हा गावातून झाला पाहिजे, रस्ता रुंदीकरण करताना मुख्य बाजारपेठेतील बाधित दुकानदार, मालक व ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, यासाठी शिवसेना आग्रही भूमिका घेणार आहे,’ अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिली.

सध्या चालू असलेले सातारा-पंढरपूर रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे व रेंगाळलेल्या अवस्थेत होत असून सुद्धा लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेने बाजारपेठ पूर्ण उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गावातील रस्ता रुंदीकरणास गावकऱ्यांचा कोणताही विरोध नाही; परंतु काही निवृत्त अधिकारी गावाचा व भागाचा विकास या नावाखाली पुसेगावच्या रिंगरोडचा प्रस्ताव शासनाकडे सादर करीत आहेत; परंतु हा रस्ता गावाच्या मुख्य बाजारपेठेतून न गेल्यास येथील सर्व बाजारपेठ पूर्ण इतिहासजमा होईल, बेरोजगार युवकांना कोणतेही साधन राहणार नाही व गाव विकासापासून दूर होईल, अशी शिवसेनेची भूमिका असून बाहेरून जाणाऱ्या रस्त्याला शिवसेनेचा कडवा विरोध राहणार असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.

चौकट..

रस्ते विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेले सातारा-पंढरपूर महामार्गाचे रस्त्याचे काम पुसेगावातील मुख्य चौकापासून सुमारे दोन किलोमीटरवर शासकीय विद्यानिकेतनपर्यंत आणून थांबवले आहे. परंतु कोणत्या कारणाने पुसेगावातील काम थांबवले आहे, याचे स्पष्टीकरण या विभागाकडून मिळत नाही. कोणत्या तरी राजकीय गटाला बळी पडून ही सर्व यंत्रणा काम करते का? अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी चर्चा केली असून, पुसेगावातील रस्त्याच्या कामाबाबत सकारात्मक तोडगा तातडीने काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.