शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फ्रॉम बास झालं आता ‘ऑन ग्राऊंड’ या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे-मुंबईबरोबर जवळचे कनेक्शन असल्याने सातारा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. रोज हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या ...

पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे-मुंबईबरोबर जवळचे कनेक्शन असल्याने सातारा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. रोज हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरापासून वाढता वाढता वाढे अशीच कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या या दिवसांत लोकप्रतिनिधींनी ॲक्टिव्ह मोडमध्ये राहणं अपेक्षित असताना भीषण औषधांची टंचाई भासत असतानाही हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणारे लोकप्रतिनिधी सातारकरांनी पाहिले. जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीचे त्यांच्या भागात स्वत:चे वलय आहे. त्यामुळे आमदारांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती करण्याकडे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचा कल असतो. नेमकं याचाच लाभ घेऊन नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, यात्रा-जत्रांवर नियंत्रण आणून कोविडला अटकाव करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं अपेक्षित असताना यात्रांना परवानगी द्या म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकणारे आणि शासनाने दंड केला तर त्याची रक्कम भरणारे महान लोकप्रतिनिधी सातारकरांनी अनुभवले. मतांच्या राजकारणापायी शंभराहून अधिक रुग्णांची भर पाडून परवानगी मागणारे आणि दंड भरणारे या दोघांनीही कलटी मारली, पण यात्रेत सहभागी झालेल्यांना कोविडने घेरले. त्यांच्यासाठी बेडसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मात्र या दोघांचाही उपयोग झाला नाही.

गतवर्षी कोविडची भीषणता लक्षात घेऊन साताऱ्यात संग्राम बर्गे, सादिक शेख आणि विनीत पाटील यांच्या संकल्पनेतून सातारा कोविड डिफेंडर ग्रुपची स्थापना झाली. या ग्रुपने लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्न पुरविण्यापासून गावी सोडण्यापर्यंतची भूमिका पार पाडली. राजकारणविरहित असलेला हा ग्रुप वर्षभर कोरोना रुग्णांसाठी प्रयत्नशील आहे. रात्री बारा आणि एक वाजता रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी ग्रुपचे सदस्य धडपडतात. रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळवून देण्यासाठी ग्रुपच्या सदस्यांनी आग्रही भूमिका मांडून प्रशासनाचे वाभाडेही काढले. कोणतीही सत्ता आणि पद नसताना सामान्यांनी सामान्यांसाठी तयार केलेला हा ग्रुप जर काम करू शकतो, तर वर्षांनुवर्षे लोकांनी निवडून दिल्याने सत्ता उपभोगणाऱ्यांना कठीण काळात बाहेर पडून काम करा, असं सांगायची वेळ येणं हेच दुर्दैवी आहे.

बंगल्यातून बाहेर ऑनग्राऊंड कामासाठी येण्याची गरज

कोरेगाव मतदारसंघातील गावात एकंबे गावात कोरोनाचा स्फोट झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेला न जुमानणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचून आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थांची तपासणी करून त्यांना स्वत: दवाखान्यात दाखल केले. स्वत: दोन वेळा कोरोनाबाधित होऊन मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढले. युद्धजन्य परिस्थिती समजावून घेऊन स्वत: ऑन ग्राऊंड काम करणारे त्यांच्यासारखे लोकप्रतिनिधी अभवानेच दिसत आहेत. गतवर्षी मोठ्या थाटात मतदारांसाठी कोविड हॉस्पिटल सुरू करून त्याच्या उद्‌घाटनाचा घाट घालणाऱ्या अनेकांनी आता तो विषय टाळला आहे. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसतना कोणताही लोकप्रतिनिधी त्यावर चकार शब्द न उच्चारणं आणि प्रशासनाला जाब न विचारणं हे सुज्ञ सातारकरांना निश्‍चितच सललंय. ही सल सातारकर योग्यवेळी काढतील, पण तोवर अनेकांना प्राणांना मुकावं लागेल अशी परिस्थिती दिसते.