शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

काम झालं २०१४ मध्ये; निविदा काढली २०१७ ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:32 IST

रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्षाचे नगरसेवक ...

ठळक मुद्देरहिमतपूर पालिकेवर आरोप : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, सरंक्षक भिंत बांधकामाच्या चौकशीची नगरसेवकाकडून मागणी

रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्षाचे नगरसेवक नीलेश माने यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहिमतपूरमधील कुंभारगल्ली येथील रस्ता सुधारणा करण्याकामी कापूर ओढा येथे आरसीसी सरंक्षक भिंत बांधकाम अंदाजपत्रकीय रक्कम २८.७५ लाख रुपये आहे. या कामाची दि. ९ मे २०१७ रोजी एका जाहिरातीद्वारे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दि. १९ जून २०१७ रोजी विशेष सभा बोलावून सभागृहामध्ये ती मंजुरीसाठी ठेवण्यात आली. हे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच झालेल्या कामाची निविदा कशी केली? अशी विचारणा केली. यावर नगराध्यक्षांनी या बाबीची चौकशी करून सभागृहास निवेदन करण्याचे आश्वासन दिले.पुन्हा दि. २७ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे या विषयाला हरकत घेतली. मागील सभेचा ठराव क्र. ५६ अ. नं.२१ मध्ये वरील काम सर्वानुमते मंजूर असा चुकीचा ठराव लिहिण्यात आला होता, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.नगराध्यक्षांनी या कामाबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना मुख्याधिकाºयांना केली. मुख्याधिकाºयांनी ३ आॅक्टोबर २०१७ रोजी या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याबाबतची सूचना कंत्राटी कामगार अबुभाई मुल्ला यांना केली होती. विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने संबंधित कंत्राटी कामगारास स्मरणपत्र काढण्यात आले. तरीही अहवाल प्राप्त न झाल्याने मुख्याधिकाºयांनी १ मार्च २०१८ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला.या अहवालामध्ये २०१४-१५ या आर्थिक वर्षात संबंधित काम पूर्ण झाले असल्याचे म्हटले आहे. त्याच कामाची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी यांच्याकडून २४ मार्च २०१७ रोजी आदेशाने मिळाल्याचे नमूद केले आहे. संबंधित काम पूर्ण झाल्याचा २०१४-१५ कामाचा ठराव, दि. २१ जुलै २०१६ कामाची प्रशासकीय मंजुरी २४ मार्च २०१७ व कामाची निविदा ९ मे २०१७ अशा उलट्या क्रमाने विकासकामाचे कामकाज करण्यात आले आहे. ही बाब गंभीर असून, जिल्हाधिकारी कार्यालयाला अंधारात ठेवून जनतेच्या पैशाचा अपहार करण्याचा उद्देश दिसून येत आहे. तरी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती, कंत्राटदार कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी काँग्रेसचे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश भोसले, रहिमतपूर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष धनंजय पवार, नानासो माने, नगरसेवक अनिल गायकवाड व माजी नगरसेवक शंकर भोसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.