शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काम चालू; गल्ला बंद.. घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:48 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम तसेच वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाचा लहान-मोठ्या सुमारे चारशे व्यावसायिकांना फटका बसला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्याने किरकोळ विक्रेत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी काही व्यावसायिकांनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. ग्राहकांना हव्या असणाऱ्या ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम तसेच वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाचा लहान-मोठ्या सुमारे चारशे व्यावसायिकांना फटका बसला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्याने किरकोळ विक्रेत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी काही व्यावसायिकांनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तूंची मोबाईल सेवेद्वारे थेट घरपोच सेवा दिली जात आहे.वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्यावर गेल्या महिनाभरापासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले आहे. कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होताच पोवईनाक्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ही कोंडी टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. याचा फटका फळ विक्रेते, टपरीधारकांसह व्यापाºयांना बसला आहे.खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्याने रस्त्याकडेला बसून चप्पल शिवणारे, चावी बनविणारे तसेच फळविक्री करणारे विक्रेते हतबल झाले आहेत. कपडे व्यावसायिंक, हॉटेल चालक तसेच इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाºयांनाही याच परिस्थितीतून जावे लागत आहे. नाक्यावरील जवळपास चारशे व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.एकीकडे ग्राहकांविना काही व्यावसायिक हतबल झाले असताना दुसरीकडे मात्र काहींनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे.ग्राहकांना हव्या असणाºया वस्तूंची थेट घरपोच सेवा दिली जात आहे. यासाठी संबंधित व्यावसायिकांनी मोबाईल सेवा सुरू केली असून, ग्राहकांचा फोन येताच मागणीनुसार वस्तू पुरविल्या जात आहे. यामुळे ग्राहकांमधूनही व्यावसायिकांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.पन्नासवरून दहा डझनावर...मुन्ना मुलाणी हे गेल्या पंचवीस वर्षांपासून पोवई नाक्यावर फळविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे रस्ते बंद झाल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. पूर्वी ५० डझन केळींची विक्री व्हायची आता दिवसभरात दहा डझनही केळी विकली जात नाहीत. आता स्थलांतर करायचं म्हटलं तर जायचं कुठं? हाच मोठा प्रश्न आहे. दिवसभरात भांडवलाचा खर्चही सुटत नाही.