शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सिव्हिल’च्या पुरुष कर्मचाऱ्यांची सुरक्षा महिलांच्या हाती !

By admin | Updated: July 6, 2017 23:52 IST

‘सिव्हिल’च्या पुरुष कर्मचाऱ्यांची सुरक्षा महिलांच्या हाती !

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत असलेले आरोप आणि कामामध्ये सुसूत्रता यावी, या हेतूने जिल्हा रुग्णालयाने पुरुष सुरक्षारक्षकांच्या सोबतीने रुग्णालयाची सुरक्षा रणरागिणींच्या हाती सोपविली आहे.जिल्हा रुग्णालयामध्ये यापूर्वी रुग्णांच्या नातेवाइकांकडून तोडफोडीचे प्रकार घडले आहेत. एवढेच नव्हे तर सिव्हिलमध्ये असलेल्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की आणि खोट्या आरोपांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे नेमके काम कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. सकाळी आणि दुपारी रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्हिजीट असते. यावेळी रुग्णांना भेटण्यास कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही. परंतु असे असतानाही सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वाढले होते. तसेच रुग्णांच्या महिला नातेवाइकांकडून वाट्टेल तसले आरोप होऊ लागले होते. या साऱ्या प्रकाराला वैद्यकीय अधिकारीच नव्हे तर सुरक्षारक्षकही हतबल झाले होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून पुरुष सुरक्षारक्षकांसमवेत महिला सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी तातडीने महिला सुरक्षारक्षक नेमण्यासाठी हालचाली केल्या. दोनच दिवसांत महिला सुरक्षारक्षकांनी सुरक्षिततेची जबाबदारी उचलली आहे.यापुढे तोडफोड अन् दंगा होऊ देणार नाही !कायद्याचा गैरवापर करून आमच्यावर गुन्हा दाखल होईल, याची धास्ती वाटत होती. मात्र आता मनात कसल्याही शंका राहिल्या नाहीत. महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक केल्याने जिल्हा रुग्णालयाला एकप्रकारचे बळ मिळाले आहे. त्यामुळे यापुढे तोडफोड अन् दंगा रुग्णालयात कसलाही होऊ देणार नाही, असे एका सुरक्षारक्षकाने आपल्या भावना ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.