शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी शाश्वत उपजीविका निर्माण करावी

By admin | Updated: March 29, 2016 23:52 IST

मकरंद पाटील : महाबळेश्वर तालुक्यातील महिलांच्या कर्तृत्वाचा पंचायत समितीतर्फे गौरव

महाबळेश्वर : ‘महिला शक्ती वेगळी ठेवून कोणताही देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळे येणारे शतक हे महिलांचे असून, महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून बँके कडून मिळणाऱ्या अर्थ साह्यांचा लाभ घेऊन विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन शाश्वत उपजीविका निर्माण करावी व प्रत्येक कुटुंबाने आर्थिक सक्षम व्हावे,’ असे आवाहन वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी केले.जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रिय पर्यावरण दिन व शहीद दिन यांचे औचित्य साधून पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील महिला सरपंच व सदस्या, बचतगटांच्या सदस्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, महिला मंडळे यांचा मेळावा व प्रशिक्षण महाबळेश्वर पंचायत समितीने आयोजित केला होता. महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या महिलांच्या मेळाव्याच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर यावेळी पाहावयास मिळाला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब भिलारे, संजय गायकवाड, राजेंद्रशेठ राजपुरे, नितीन थाडे, दिलीप शिंदे, उज्ज्वला तोष्णीवाल, विमल पार्टे, संगीता वाडकर, अर्पणा सलागरे, रेहाना मानकर, प्रज्ञा पवार, किसनशेठ शिंदे, वंदना वळवी, उमा शेडगे सहभागी झाले होते. ज्यांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ते बाळासाहेब भिलारे यांनी हा तालुका अतिदुर्गम क्षेत्रामध्ये मोडत असून, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून आता महिलांची मोठी शक्ती निर्माण झालेली आहे. या शक्तीचा वापर एम.आर.ई.जी.एस अंतर्गत कामे करून आर्थिक मदत व गावातील कामे करण्यासाठी करण्याचा तसेच बचत गटांना अधिकाधिक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रशिक्षण देणे, महिला ग्रामसभा, लोकसहभाग याबाबत जाणीव जागृती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुक्याचे नावलौकिक वाढविण्यासाठी वैशिष्टपूर्ण योगदान दिलेल्या १९ पुरस्कार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.रायगड येथील प्रशांत देशमुख यांनी ‘जगणं सुंदर आहे’ यावर व्याख्यान दिले. सिकंदर शेख यांन प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे विस्ताराधिकारी सुनील पारठे यांनी सूत्रसंचालन केले. सहा. गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी परिचय करून दिला. अप्पा जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)