शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बस उलटून महिला ठार

By admin | Updated: January 23, 2015 23:43 IST

१८ प्रवासी जखमी : फळणीजवळील दुर्घटना; जखमींमध्ये इस्लामपूर, बांबवडे येथील महिलांचा समावेश

सातारा : जावळी तालुक्यातील फळणी गावच्या हद्दीत असणाऱ्या आपटीच्या वळणावर भाविकांना घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार, तर १७ महिला आणि एक असे १८ जण जखमी झाले. मृत आणि १६ जखमी वाळवा आणि इस्लामपूर तालुक्यातील, तर दोन जखमी शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील आहेत.राणी उमेश करे (रा. धनगर गल्ली, उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव असून, सर्व जखमींवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी पाच ते सहा महिला गंभीर आहेत. दरम्यान, या घटनेनंतर चालक भूषण बापूराव पाटील (रा. इस्लामपूर) याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.याबाबत जिल्हा रुग्णालय आणि मेढा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) येथील तीसहून अधिक महिला आणि सहा ते सात लहान मुले गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठामध्ये गणेश दर्शनासाठी शुक्रवारी पहाटे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसने (एमएच ११ टी ९६९६) निघाल्या होत्या. सकाळी पावणेआठ वाजता बस फळणी गावच्या हद्दीत आली. आपटी गावाजवळच्या वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. बहुतांश प्रवासी झोपेत होते. बस उलटल्याने एकच गोंधळ उडाला आणि जोराचा आक्रोश सुरू झाला. या घटनेत राणी करे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अठराजण जखमी झाले.अठरा जखमींपैकी इंदूबाई जालिंदर गवंडी (वय ५०), ओमकार उमेश करे (१४), धोंडूबाई सयाप्पा शेडगे (६५), शकूबाई बाबा कोळेकर (५८), धोंडूबाई बाबा कोळेकर (६२), यशोदा बाबू गवंडी (३८), रेखा उत्तम कोळेकर (३०), आरती रामचंद्र कोळेकर (१९), पार्वती वसंत बंडगर (५२), कमल संभाजी ढोबळे (६०), राधाबाई शिवाजी माने (५०), कोमल शामराव ताटे (१८), बाळाबाई संभाजी कोळेकर (४०, रा. अहिल्यादेवी नगर, इस्लामपूर), मालन विठ्ठल करे (५०), साखरु रामचंद्र कोळेकर (४०) हे सोळाजण इस्लामपूरचे, तर धनश्री आनंदा जानकर (१३), बाळाबाई तुकाराम जानकर (६०) या बांबवडे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील आहेत. (प्रतिनिधी)दर्शन तर झालेच नाही..!इस्लामपूरच्या या महिला भाविकांनी गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठात गणेश दर्शनासाठी येण्याचे दोनच दिवसांपूर्वी ठरवले होते. दर्शनानंतर या महिला पुणे जिल्ह्यातील प्रतिबालाजी नारायणपूर येथे जाणार होत्या. मात्र, तो निर्णय त्यांनी रद्द केला आणि गणेशदर्शन घेऊन पुन्हा इस्लामपूरला परतण्याचे त्यांनी ठरविले. शक्रवारी पहाटे पाच वाजता सगळे इस्लामपूरहून निघाले आणि पावणेतीन तासांतच गाडीला अपघात झाला. त्यामुळे दर्शन झालेच नाही.दर्शन तर झालेच नाही..!इस्लामपूरच्या या महिला भाविकांनी गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठात गणेश दर्शनासाठी येण्याचे दोनच दिवसांपूर्वी ठरवले होते. दर्शनानंतर या महिला पुणे जिल्ह्यातील प्रतिबालाजी नारायणपूर येथे जाणार होत्या. मात्र, तो निर्णय त्यांनी रद्द केला आणि गणेशदर्शन घेऊन पुन्हा इस्लामपूरला परतण्याचे त्यांनी ठरविले. शक्रवारी पहाटे पाच वाजता सगळे इस्लामपूरहून निघाले आणि पावणेतीन तासांतच गाडीला अपघात झाला. त्यामुळे दर्शन झालेच नाही.