शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भरतगाव वाडीजवळ अपघातात महिला ठार; युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावचे हद्दीत एका दुचाकीस मालट्रकने दिलेल्या धडकेत मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एक ...

नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावचे हद्दीत एका दुचाकीस मालट्रकने दिलेल्या धडकेत मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार तर, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. सारिका तानाजी मोहिते (वय ३२ वर्ष) रा. नागठाणे ता. सातारा असे मयत महिलेचे नाव असून वैभव विलास सकटे (वय १९) रा. अंगापूर, ता. सातारा असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत एका अज्ञात मालट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराडकडे जाणाऱ्या मार्गावरून सोमवार दि. २१ रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास वैभव सकटे हा युवक शेंद्रे येथून आपली आत्या हिला दुचाकी क्र. एमएच ११ डीसी ४१५२ वरून घेऊन नागठाणे येथे सोडण्यासाठी निघाला होता. भरतगाववाडी गावचे हद्दीत आले असताना एका शिवशाही बसला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करून मालट्रक चालक भरधाव वेगाने पुढे आला आणि त्याने समोरून निघालेल्या दुचाकी गाडीस जोराने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यावेळी दुचाकीवर बसलेली महिला जोराने रस्त्यावर पडली आणि मालट्रकच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत झाली. दुचाकीचालक युवकही खाली पडल्यामुळे तोही गंभीर जखमी झाला. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अज्ञात मालट्रक चालकाने तेथे न थांबता मालट्रकसहित तेथून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच हायवे बिट चारचे सचिन पोळ, पी. सी. शिंदे, बी. आर. नदाफ, बोरगाव पोलीस ठाण्याचे किरण निकम, उत्तम गायकवाड, राहुल भोये, कपिल टिकोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी युवकास उपचारासाठी नागठाणे आरोग्य केंद्रात पाठवून दिले. रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने सुरळीत करून दिली. याबाबतची तक्रार वैभव सकटे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून, अधिक तपास सपोनि डॉ. सागर वाघ करत आहेत.