शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनचा बेड न मिळाल्याने हॉस्पिटलच्या दारातच महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:39 IST

सातारा : ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ न शकल्याने जम्बो कोविड हॉस्पिटलच्या दारातच ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सातारा ...

सातारा : ऑक्सिजन बेड उपलब्ध होऊ न शकल्याने जम्बो कोविड हॉस्पिटलच्या दारातच ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून पडली आहे. अनेक कोरोना रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. बेड आणि ऑक्सिजन वेळेत मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे दावे वारंवार करण्यात येत आहेत. पण मोठ्या प्रमाणात रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांचा जीव जाण्याच्या घटना घडण्यास सुरुवात झाली आहेत.

रविवारी अशीच एक धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली. वाई येथील ५७ वर्षीय महिलेला तब्बल ६ तास शहरात फिरूनही उपचार मिळू न शकल्याने जम्बो हॉस्पिटलच्या दारात अ‍ॅॅम्ब्युलन्समध्ये मृत्यू झाला. वृद्ध महिलेला त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलाने रविवारी सकाळी १० वाजता वाईतून साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात आणण्यात आले. त्यावेळी काहींनी जम्बोला बेड मिळेल असे सांगितल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना ११ वाजता जम्बो हॉस्पिटलला आणले.

यावेळी संबंधित डॉक्टरची कागदपत्र हे महिलेच्या मुलांनी जम्बोच्या रिसेप्शनजवळ दिले. त्यांनी मृत महिलेच्या मुलांना तुम्हाला बोलावतो, असे सांगितले. याचदरम्यान महिलेची ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली. त्यामुळे त्यांना तातडीने ऑक्सिजन बेड देऊन अ‍ॅडमिट करून घेण्याची विनंती मुलांनी रुग्णालय प्रशासनाला केली.

मात्र, त्या ठिकाणी ही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही, अशीच उत्तरे मिळाली.