शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वाईत लिपिक जाळ्यात

By admin | Updated: September 1, 2014 23:02 IST

१0 हजाराची लाच : भूमिअभिलेख कार्यालयात सापळा

वाई : येथील भूमिअभिलेख कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या कृष्णात यशवंत मुळीक (वय ४५, रा. जेजुरीकर कॉलनी, वाई) यास फाळणी नकाशा नकल काढून देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास एका कारमध्ये पैसे घेताना ही कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णात मुळीक सातारा येथील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत होता. त्यावेळी त्याला एका बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्याने कोंडवे (ता. सातारा) येथील गट नंबर १७९ चा फाळणी नकाशा काढून देण्यासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी मुळीक याने त्यांच्याकडे १२ हजारांची मागणी केली होती. त्यानंतर मुळीकची बदली वाई भूमिअभिलेख कार्यालयात झाली. त्यावेळी तक्रारदार यांनी मुळीकशी संपर्क साधला असता ‘तुमची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. तुम्ही ती घेण्यासाठी वाईला या. तुमचे काम झाले आहे.’ असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास वाई येथील मिशन हॉस्पिटल रोडवर कार (एमएच ११ एके ९९७८) मध्ये दहा हजारांची लाच घेताना मुळीकला रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. एस. कुरळे व पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)