शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘विंग’ला जुगार अड्डा ‘झिंग’ला !

By admin | Updated: March 5, 2016 00:09 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : विद्यालयानजीक दारू अड्डाही फोफावला; मद्यपींचाही वावर; ग्रामस्थ त्रस्त

विंग : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गालगत विंग हॉटेल येथे सध्या जुगार अड्डा भरविला जात आहे. दिवसाढवळ्या तसेच मध्यरात्री पर्यंतही येथे पत्त्याचा डाव चालत असून, विद्यालयानजीकच हा प्रकार होत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. या जुगार अड्ड्याबाबत तालुका पोलीस अनभिज्ञ आहेत की, जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. विंग हॉटेल हे परिसरातील महत्त्वाचे ठिकाण आहे. परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांची दररोज याठिकाणी वर्दळ असते. तसेच नजीकच विद्यालय आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थीही याठिकाणी ये-जा करतात. हा परिसर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखला जायचा. मात्र, सध्या अवैध व्यावसायांनी या परिसराला घेरले आहे. येथे दारूअड्डा चालविला जातो. त्यामुळे मद्यपी दिवसभर येथे वावरत असतात. त्याचा नाहक त्रास विद्यार्थी व ग्रामस्थांनाही होतो. येथील काही पान शॉपमध्ये मटकाही खेळला जात असल्याचे दिसते. त्यामुळे मटका खेळणारेही दिवसभर येथे वावरत असतात. अशातच भरीस भर म्हणून रस्त्यानजीकच्या एका इमारतीमध्ये जुगाराचा डाव भरत आहे. येथे बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विंग, येरवळे परिसरातील काहीजण दिवसभर येथे ठाण मांडून असतात. सकाळी अकरा वाजल्यापासून हा डाव सुरू होतो. कधी-कधी रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत डाव संपतो तर कधी पहाटेपर्यंत सुरूच असतो. या इमारतीपासून दररोज शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. शाळकरी मुले हा जुगाराचा डाव पाहतात. त्यामुळे त्यांच्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथील ग्रामस्थांनाही जुगार अड्ड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दारूसाठी तर येथे रेशनिंगसारखी रांग लागल्याचे अनेकवेळा पाहायला मिळते. हे मद्यपी दारू पिऊन त्याचठिकाणी नाहक बडबड करीत असल्याने अनेकवेळा वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. रात्री उशिरापर्यंत त्यांची ही वादावादी सुरू असते. या सर्व प्रकाराबाबत पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी)दिवसभर आकडेमोडविंग हॉटेल परिसरातील मटका अड्ड्यावर दिवसभर आकडेमोड सुरू असते. या अड्ड्याजवळ दिवसभर मद्यपींचा वावर असतो. तसेच अनेक मजूर दिवसभर काम करून सायंकाळी येथे येतात. येथेच ते आकडा लावतात आणि मद्यप्राशनही करतात. त्याचस्थितीत ते घराकडे मार्गस्थ होतात. एकूणच हा परिसर अवैध धंद्यांचे माहेरघर बनल्याची परिस्थिती आहे.