शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

पवनचक्की कंपन्यांची मुजोरी सहन करणार नाही

By admin | Updated: May 25, 2015 00:31 IST

मोझर यांचा पत्रकाद्वारे इशारा

सातारा : ‘सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ पाटण येथील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. पवनचक्की कंपन्यांची मुजोरी आम्ही सहन करणार नाही,’ असा इशारा ‘मनसे’च्या संदीप मोझर यांनी दिला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाटण तालुक्यात पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविषयी ‘लोकमत’च्या दि. २४ मे च्या अंकात मांडलेल्या शेतकऱ्यांच्या कैफियत वाचून कार्यकर्त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या वेदना काय असतात. हे जवळून अनुभवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासकामांच्या नावाखाली शेतकऱ्यांना भुरळ घालून गळचेपी करणाऱ्या व जमीन बळकावू पाहणाऱ्या पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार मनसैनिक कदापि सहन करणार नाही.या बाबतीत विनाविलंब शेतकरी व पवनचक्की कंपनीच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली असून, सत्यपरिस्थिती फारच विचित्र असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवरील अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण पवनचक्की कंपन्यांची मुजोरी मनसैनिकांकडून सहन केली जाणार नाही. पवनचक्की कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला न देता शेतकऱ्यांच्याच जागेतून रस्ता करून शेतकऱ्यांवरचं खोट्या तक्रारी दाखल करून पैशाच्या जोरावर तेथील भूमिपुत्रांना तुरुंगात पाठविले आहे. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे, या बद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. यापुढे शासकीय रस्ता सोडून शेतकऱ्यांच्या मालकीचा जमिनीतून योग्य तो मोबदला न देता गाड्यांची ने-आण सुरूचं राहिल्यास व शेतकऱ्यांना केवळ आश्वासने देऊन ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे स्टाईलने पवनचक्की कंपन्यांना उत्तर दिले जाईल. व या पुढे होणाऱ्या सर्व बाबींना पवनचक्की व्यवस्थापनच जबाबदार असेल,’ असा इशारा मोझर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)