शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वने वाऱ्यावर; समित्या कागदावर

By admin | Updated: November 22, 2014 00:19 IST

सदस्य अधिकारांपासून अंधारात : लाकूडतोड, शिकार मात्र सुरूच

सणबूर : लोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समिती स्थापन करण्यात आली; मात्र त्या समित्या सध्या कागदावरच राहिल्या असल्याचे चित्र आहे़ अनेकांना ते त्या समितीत आहेत, याचीही माहिती नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे राजरोसपणे जंगलपट्ट्यात लाकूडतोड व शिकार सुरू असतानाही, त्याची माहिती वन विभागाला तातडीने मिळू शकत नाही़ या समित्यांना अनेक अधिकार असताना त्यांच्या अधिकारांचीही जाणीवच करून देण्यात आलेली नाही़ त्यामुळे या समित्या असून नसल्यासारख्या आहेत़ ढेबेवाडी विभागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे़ त्याच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागावर आहे़ मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची अपुरी असलेली संख्या आणि मोठ्या प्रमाणात असणारे कार्यक्षेत्राचा मेळ घालणे अवघड बनले आहे़ सध्या उपलब्ध असलेल्या वनाचे रक्षण, लोकसहभाग वाढावा आणि लोकांच्यामध्ये त्याबाबतची जनजागृती व्हावी, यासाठी गावोगावी वनसंरक्षण समिती स्थापन करण्यात आली़ त्यानुसार ज्या-ज्या ठिकाणी वनक्षेत्र व त्याचा परिसर आहे, त्या ठिकाणच्या प्रत्येक गावात वनसमितीची स्थापना करण्यात आली आहेत़ या समित्यांना अनेक हक्क व अधिकार देण्यात आले आहेत़ असे असतानाही मात्र त्या समित्यांच्या कामामध्ये सातत्य दिसत नाही़ स्थापन करण्यात आलेल्या वनसमित्या केवळ कागदावरच राहिल्याने वनाच्या व वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ शिवाय परिसरात लाकूडतोड सुरू असल्याचे दिसून येत आहे़ त्याबाबतची माहिती वनविभागाला मिळत नाही़ त्यामुळे त्यांना कारवाई करताना समस्या निर्माण होत आहेत़ परिणामी लाकूडतोड करणाऱ्यांवर कारवाई होणार कशी? हाच प्रश्न निर्माण झाला आहे़ (वार्ताहर)सदस्यच अनभिज्ञवनसंरक्षण समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक हे सदस्य असतात़ तर वनपाल हे त्या समितीचे सचिव असतात़ त्याचबरोबर स्वायत्त संस्थेने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती आणि अन्य सहा सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असतो; पण अनेक ठिकाणी या अन्य सहा सदस्यांनाच आपण समितीत असल्याचे माहीत दिसत नाही़