शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सातारचा ‘भोपाळ’ करणार का ?

By admin | Updated: November 26, 2014 00:06 IST

‘भीमेश्वरी’ चे प्रदूषण : देगाव, निगडी ग्रामस्थांचा सवाल; ‘पीसीबी’च्या आदेशाला केराची टोपली

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील भीमेश्वर इस्पात कंपनीतून बाहेर सोडण्यात येणाऱ्या धूर व कार्बनमुळे नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होऊ लागले आहेत. अनेकदा या कंपनीच्या प्रशासनाला नागरिकांनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देवूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे या कंपनीचे प्रशासन भोपाळच्या पुनरावृत्तीची वाट पाहातय का, असा सवाल कारंडवाडी, देगांव, निगडी परिसरातील नागरिक करीत आहेत.देगाव रस्त्यावरील लोकवस्तीलगत भीमेश्वर इस्पात हा लोखंड प्रक्रिया करून स्टीलनिर्मिती करणारा कारखाना आहे. कारंडवाडी, देगाव आणि निगडी परिसर या कारखान्याला लागून आहे. या कंपनीमध्ये रात्रंदिवस उत्पादन सुरू केले आहे. कारखान्यातील काजळी, धूर स्वरूपात कार्बन बाहेर फेकला जातो. ज्या ठिकाणाहून धूर सोडण्यात येतो, ती नळी (चिमणी) ची उंची कमी आहे. त्यातच तो भाग सखल असल्यामुळे त्यातून बाहेर पडणारा धूर वाऱ्यामुळे कारंडवाडी परिसरात पसरतो. धुरामुळे रहिवाशांच्या डोळ्यांची जळजळ होत आहे. घरांची पत्रे, छतावर काजळीचा थर साठला आहे. घरांच्या खिडक्या, काचा, भांडी, काळी पडू लागली आहेत.देगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही या धुराचा त्रास होत आहे. केवळ धुराड्यातूनच नव्हे तर कारखान्याच्या शेडमधूनही मोठ्या प्रमाणात धूर, कार्बनचे लोट बाहेर येत आहेत. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याबाबत परिसरातील नगरिकांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नाही. धुरामुळेच नागरिकांच्या आरोग्यला धोका होत आहे. हे वैद्यकीय तपासणी केल्याशीवाय समजणार नाही, त्यामुळे प्रशासनाने आजारी पडणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, अशीही नागरिकांतून मागणी होत आहे. माणसांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही ग्रामस्थ करीत आहेत.प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला इमीशन कंट्रोल बसवून घ्यावे, अशा आशयाचे नोटीस पाठविले आहे. मात्र अद्याप कंपनीच्या प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून आणखीनच संतापाची लाट उसळली आहे. प्रदूषण मंडळालाही न जुमानणाऱ्या या कंपनीच्या प्रशासनाला नागरिकांतून उठाव झाल्यानंतर तरी जाग येईल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.येत्या काही दिवसांत जर त्या कंपनीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही पाऊल न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी वेळोवेळी कंपनीला दिला आहे. (प्रतिनिधी)झोपेत जीव गुदमरण्याची भीतीदेगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही या धुराचा त्रास होत आहे. केवळ धुराड्यातूनच नव्हे तर कारखान्याच्या शेडमधूनही मोठ्या प्रमाणात धूर, कार्बनचे लोट बाहेर येत आहेत. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याबाबत परिसरातील नगरिकांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नाही. रात्री अचानक झोपेत असताना धूरामुळे जीव गुदमरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या कमालीचे भीतीचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. जास्त धुराचाही आरोग्यास धोका असतो. त्यामुळे इस्पात कंपनीला इमीशन कंट्रोल बसवून घ्या म्हणून नोटीस दिली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतीच कारवाई झालेली नाही.- आय. टी. गायकवाड, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी