शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ोरेंना त्यांची जागा दाखविणारच !

By admin | Updated: April 26, 2017 23:39 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : पवारवाडीतील सभेत सणसणीत इशारा, माझा राजकीय जन्मच बंडखोरीतून

फलटण : ‘सांगलीच्या तुरुंगातून सुटून आलेल्या व ज्याचे घरातील व्यक्तीशीही पटत नाही, अशा माणच्या माणसाला तालुक्यात थारा देऊ नका, माझ्यावर राजकीय पेक्षा वैयक्तिक टीका करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. माझा राजकीय जन्मच बंडखोरीतून झाला आहे. त्यामुळे आमदार जयकुमार गोरेंसारख्या माणसाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा सणसणीत इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला. पवारवाडी (ता. फलटण) येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर आदी उपस्थित होतेरामराजे म्हणाले, ‘संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वांपर्यंत मनमिळावू काम सुरू केले आहे. २५ वर्षे त्यांनी तालुक्याची सेवा केली आहे. अनेक दौरे यशस्वी केले आहेत. ग्रामीण भागातील सोसायट्या, ग्रामपंचायती व अन्य संस्थांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून, त्यांनी केलेल्या कामाची हीच खरी पोच पावती आहे. माझ्या राजकीय यशामध्ये माझे भाऊ व ज्येष्ठ नेते दादाराजे यांचाही मोठा वाटा आहे.सध्या राज्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथ सुरू असून, त्यात आपल्या जिल्ह्याने माजी मंत्री शरद पवार यांच्यावर प्रेम दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवली. परंतु ज्यांनी काँग्रेसची संस्कृती नीट जोपासली नाही त्यांनीच नाश करायला सुरुवात केली. त्या माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला राजकीय शहाणपण शिकवू नये. ज्या चिमणराव कदमांनी तालुक्यात राजकारण केले त्यांची ग्रामपंचायतही वाईट प्रवृत्तीकडे गेल्याने आपल्या मनाला वाईट वाटत आहे. त्यामुळे नको त्या माणसाच्या हातात सत्ता देऊ नका. तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आणले, विविध विकासकामे केली. २५ वर्षे सत्ता आमच्या ताब्यात दिली, आमच्यावर मोठा विश्वास दाखवला त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व भागाची नेहमीच साथ मिळाली, असे रामराजे म्हणाले. (प्रतिनिधी)शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे...‘ज्या सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला समृद्ध करण्याचे आश्वासन दिले होते. त्या सरकारने तूर, कांदा, पालेभाज्यांचे दर पाडले ते सरकार काय करणार? ज्या शरद पवारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले होते. शेतकरी महत्त्वाचा घटक मानून कार्य केले त्या शरद पवारांची किंमत जनतेला कळली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे, ही आमची इच्छा आहे. तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणाऱ्या शरद पवारांचा फलटण तालुका कायमच ऋणी आहे,’ असेही रामराजे यांनी सांगितले.