शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

डंपर, टीपर चालवून प्रश्न सुटतील का:शिवेंद्रसिंहराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:08 IST

सातारा : ‘डंपर आणि टीपर चालवून सातारकरांचे प्रश्न सुटतील, असा बालिशपणा दाखविणाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांनीच नगराध्यक्षा व्हावे, असे म्हणणे म्हणजे आपली जबाबदारी झटकून जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवणे आहे. जिल्हाधिकाºयांना कशाला, ज्या साशा कंपनीमुळे सातारकरांचे जगणे मुश्कील झाले आहे, त्या साशा कंपनीलाच पालिका चालविण्यास द्या, म्हणजे तुमचे समाधान होईल,’ असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे ...

सातारा : ‘डंपर आणि टीपर चालवून सातारकरांचे प्रश्न सुटतील, असा बालिशपणा दाखविणाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांनीच नगराध्यक्षा व्हावे, असे म्हणणे म्हणजे आपली जबाबदारी झटकून जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवणे आहे. जिल्हाधिकाºयांना कशाला, ज्या साशा कंपनीमुळे सातारकरांचे जगणे मुश्कील झाले आहे, त्या साशा कंपनीलाच पालिका चालविण्यास द्या, म्हणजे तुमचे समाधान होईल,’ असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सव तोंडावर आला असून, गणेशोत्सवानंतर गणेशमूर्ती कोठे विसर्जित करायच्या? असा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा शहरातील गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन कोठे करायचे, याबाबत निर्णय घेण्यास आणि तोडगा काढण्यास सातारा पालिकेने खूपच उशीर केला आहे. आता गणेश मंडळांच्या बैठका घेऊन आणि चर्चा करून सत्ताधारी चूक लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.वास्तविक विसर्जन कोठे करायचे, याचा निर्णय गणेश मंडळे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे चर्चेचा फार्स कशासाठी केला? काही दिवसांपूर्वीच खासदारांनी रिसालदार तळ्यात विसर्जन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पोलीस प्रशासनाने मात्र विसर्जनास नकार दिला आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनाचा प्रश्न आता जटील बनला आहे. त्यामुळे खुशीत गाजरे खाणाºयांची झोप उडाली आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हाधिकाºयांना दगडाची उपमा देऊन आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी म्हणजे म्हटलं तर देव आणि म्हटलं तर दगड, असे म्हणणाºयांना जनाची नाही तर, मनाची तरी लाज वाटायला हवी होती.वाळू ठेक्यांचे परवाने हवे तसे मिळाले की जिल्हाधिकारी देव आणि सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावला की जिल्हाधिकारी दगड, तुम्हाला असे म्हणायचे आहे का? असा बोचरा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीपूर्वी जी आश्वासने सातारकरांना दिली. त्यांना भावनिक करून सत्ता मिळवली. आज त्याच सातारकरांची काय अवस्था करून ठेवली आहे? साताºयातील सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील सर्वच कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. सातारकरांना घरातून बाहेर पडणे आणि वाहन चालवणे मुश्कील बनले आहे.खापर दुसºयावर फोडून प्रश्न सुटणार का?‘सातारा पालिकेचा कारभार रामभरोसे चालला असून, गणेशमूर्ती विसर्जनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक विसर्जनाची जबाबदारी ही सातारा नगरपालिकेची आहे. असे असताना पालिकेचा कुचकामी, नियोजनशून्य कारभार आणि स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आपले लोकप्रिय खासदार जिल्हाधिकाºयांना दगड संबोधून लपण्याचा प्रयत्न करत आहेत. गणेशमूर्ती विसर्जनाला तोशिष लागली तर सातारकर तुम्हाला माफ करणार नाहीत,’ अशी टीकाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू...स्वच्छता अभियान आणि शहर स्वच्छतेसाठी करोडो रुपयांचा चुराडा केला तरीही ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या साताºयाचा पहिल्या दहामध्ये नंबरही आला नाही. साशा नावाचे भूत सातारकरांच्या मानगुटीवर बसवून पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू आहे. तरीही शहरात कचरा आहे. कमिशनला कंटाळून बिचाºया घंटागाडीचालकाला विषप्राशन करावे लागते, यावर कोणीही ब्र शब्द काढत नाही, हेच का तुमचे रोल मॉडेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.चुकीच्या कामाला यापुढेही विरोधपैसा, टक्केवारी आणि कमिशन यातून बाहेर पडला तर, तुम्हाला सातारकरांच्या समस्या दिसतील.जिल्हाधिकाºयांना दगड म्हणून समस्येपासून पळ काढण्यापेक्षा गणरायाच्या विसर्जनाचे विघ्न दूर करण्यासाठी याआधीच हालचाल करायला हवी होती.गणेश विसर्जनाचा प्रश्न सुटला नाही तर, सातारकर जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही.जिथे चुकीचा कारभार तिथे नगरविकास आघाडी तुम्हाला विरोधच करत आली आहे आणि सातारकरांच्या हितासाठी यापुढेही विरोध करत राहील.