शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

ग्रामपंचायतीचा कारभारी बदलणार का?

By admin | Updated: April 1, 2015 00:11 IST

तरडगाव ग्रामस्थांमध्ये चर्चा : वर्षानंतरही पदाधिकारी निवडीच्या हालचाली नाहीत

सचिन गायकवाड - तरडगाव , ता. फलटण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वर्षाच्या कारभारानंतर ‘लोकमत’ने काही सदस्यांशी संवाद साधला असता वरिष्ठ नेत्यांकडून प्रत्येक सदस्याला पाच वर्षांच्या काळात सरपंच, उपसरपंच पदाची संधी विभागून दिली जाईल, असे आश्वासन दिले गेल्याची माहिती समोर आली. सत्ताधाऱ्यांची सदस्य संख्या दहा आहे. मात्र, वर्ष झाले तरी अजून नवीन पदाधिकारी निवडीसाठी हालचाली होताना दिसत नाहीत. यामुळे कारभारी बदलून इतरांना संधी दिली जाणार की नाही? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.डिसेंबर २०१३ मध्ये राजे गटाच्या आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलने १५ पैकी १० जागा जिंकून विरोधी तरडगाव विकास आघाडीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्च २०१४ मध्ये सरपंच, उपसरपंच पदांच्या निवडी झाल्या. वर्षाच्या कारभारानंतर काही सदस्यांशी संवाद साधला तेव्हा, त्यांच्याकडून वेगळीच माहिती समोर आली. त्यांच्या सांगण्यावरून गेल्यावर्षी फलटण येथील बैठकीत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना पुढील पाच वर्षांत गावचा करभार पाहण्याची म्हणजेच सरपंच, उपसरपंच पदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.सध्या ग्रामपंचायतीत सत्ताधारी सदस्य संख्या दहा आहे. यावरून प्रत्येकाला संधी द्यावयाची झाल्यास प्रत्येक वर्षी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करावी लागणार हे सरळ गणित आहे. परंतु, वर्ष झाले तरी पदाधिकारी निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या नसल्याचे नाराज सदस्यांच्या बोलण्यावरून दिसून येते.सन २००८-०९ मध्ये चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून विरोधी तरडगाव विकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून भैरवनाथ पॅनेलचा पराभव केला होता. वसंतराव गायकवाड यांची २५ वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली होती. त्यानंतर विकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये, सर्व सामान्यांना सत्तेत समान संधी मिळावी, पदे कोणा एकाच्या घरात वाटली जावू नयेत, कोणाचीही मालकी असू नये या उद्देशाने पाच वर्षांत सर्व सदस्यांना सरपंच, उपसरपंच ही पदे विभागून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पुढे तो प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आला.विकास आघाडीने पाच वर्षांत सर्व सदस्यांना जशी कारभाराची संधी दिली. तसे चित्र सध्या सत्ताधारी असलेल्या भैरवनाथ पॅनेलकडून आपल्या सर्व सदस्यांना पदांची संधी देऊन पुढील काळात दिसणार का? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. एकीकडे सत्ताधारी सदस्यांमध्ये आपल्याला देखील पद मिळावे, अशी कुजबूज सुरू आहे. बोलायचे आहे; पण बोलू कसे अशी दुविधा असल्यामुळे सगळ्यांनीच हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका स्विकारली आहे. मनातील भावना कोणत्या पध्दतीने व्यक्त कराव्यात हे समजत नसल्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली आहे. सर्व समावेशक भूमिका गरजेचीपदाच्या व गटाच्या पुढील राजकीय उज्ज्वल भवितव्यासाठी दिलेल्या आश्वासनावरून पाच वर्षांत सर्वांना पदांची संधी देता यावी, यासाठी स्थानिक व तालुका पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत ठोस सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा काही सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.