औंध : ‘औंधसह परिसरातील शेतकऱ्यांची जीवनशैली उंचावण्यासाठी तसेच योग्य व रास्त दर मिळण्यासाठी राजयोग दूध संकलनाची निर्मिती केली आहे,’ असे प्रतिपादन राजयोग फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमर देशमुख यांनी केले.
औंध येथे राजयोग कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी संचलित राजयोग दूध संकलन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औंधमधील शेतकरी बांधवांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
औंधचे उपसरपंच दीपक नलवडे, अलीम मोदी, राजाभाऊ देशमुख, महिपती पवार, बाबा गोसावी, संतोष देशमुख, अण्णा माकार, पोपट जगदाळे, संदीप इंगळे, भगवान यादव, संजय लावंड, अनिल चव्हाण, बाबू माने, सावता यादव, रोहित पवार, बंडा देशमुख, कुणाल जाधव, प्रवीण करांडे, अनिकेत देशमुख, अमृतराव देशमुख, अजित साळुंखे, प्रभाकर यादव, हर्षद देशमुख, तानाजी चव्हाण, चंद्रकांत पवार, प्रमोद गुळवे, आनंदा घोडके, शंभूराजे देशमुख, प्रभाकर देशमुख, महादेव माने, श्रीपाद सुतार, आशिष देशमुख, सागर यादव, सतीश देशमुख, कोंडिराम देशमुख, रवी जामकर, सूरज देशमुख, संदीप चव्हाण, कृष्णात देशमुख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, शेतकरी वर्ग डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आणि समृध्दीचा मार्ग म्हणजे शेतीपूरक दुग्ध व्यवसाय असून शेतकऱ्यांनी हा व्यवसाय चांगल्याप्रकारे करावा. यासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे तानाजी इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत जाधव यांनी आभार मानले. (वा.प्र.)
०३औंध जाहिरात
फोटो:-औंध येथे राजयोग कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी संचलित राजयोग दूध संकलन केंद्राचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. (छाया : रशिद शेख)