शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

पीके क्यूं बोला ?

By admin | Updated: January 10, 2015 00:16 IST

फेरफटका

टी.वाय.बी.ए. मध्ये शिकत असताना आम्हाला व्याकरण सोडविण्या-साठी एक वाक्य होते : ळङ्म २स्रीं‘ ३ँी ३१४३ँ ा१ंल्ल‘’८ ्र२ ं १्र२‘ ु४३ ८ङ्म४ ३१ं५ी ३ङ्म. अर्थात निखळ सत्य बोलण्यात धोका आहे, परंतु तुम्हाला सत्य बोलावे लागेल. पुढे ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटीसचे अल्पचरित्र वाचताना या वाक्याची महती पटली होती. विद्रोही कवी तुकाराम, जोतिबा फुले, सावित्रीबाई आणि अलीकडे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनीही हा धोका पत्करला. दाभोळकरांनी कोणताही अभिनिवेश न आणता आणि कोणत्याही धर्मश्रद्धेला विरोध न करता अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले होते. तरीही तथाकथित पुण्यनगरीत त्यांचा खून झाला. सॉक्रेटीसवर खटला भरून त्याला मृत्यूदंड देण्यात आला होता. दाभोळकरांवर कोणताही खटला न भरता नि:शस्त्र असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. माणसांनी माणसाला ठार करावे, एवढा द्वेष माणसांमध्ये कसा काय निर्माण होऊ शकतो ? आपण खऱ्या अर्थाने माणूस असू तर विवेकी असलो पाहिजे, अन्यथा माणूस म्हणवून घेण्याचा तरी आम्हास काय अधिकार ? माणसाला अधिकाधिक विवेकी बनवून सत्याशी इमान राखण्याची सवय लावणे हे खऱ्या अर्थाने मानवतेचे कार्य आहे. हे सर्व इथे आठवण्याचे कारण ‘पीके’ या सिनेमाने केलेली विवेकवादाची पाठराखण. एक तद्दन व्यावसायिक सिनेमा म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा हा चित्रपट नाही. म्हणूनच त्याची गंभीरपणे नोंद घेणे आम्हास महत्त्वाचे वाटते. सिनेमा हा अखेर व्यवसाय आहे. तो लोकांनी पाहिला पाहिजे, हे भान कोणत्याही निर्मात्यास असलेच पाहिजे. पण, चार-दोन सेक्स आणि व्हॉयलन्सची दृश्ये, एक-दोन स्टंट, भव्य स्टेटस्, रोमँटिक गाणी यामुळेच केवळ व्यवसाय होतो असे नाही, तर यातील थोडेफार घेऊन मुख्य लक्ष्य मानवतेच्यादृष्टीने व्यापक ठेवूनही हे साध्य करता येते. हे अवघड काम निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक अभिजात जोशी आणि प्रमुख कलाकार आमीर खान यांनी कौशल्याने साकारले आहे. मुख्य म्हणजे कोट्यवधी रूपयांचा हा प्रकल्प राबविताना त्यांनी प्रचंड धोका पत्करला आहे. पत्करलाच पाहिजे ही भूमिका त्यामागे आहे. पण, अभिनिवेश नाही. ढोंगाला आणि पिळवणुकीला विरोध आहे. पण, कोणत्याही धर्मश्रद्धेला विरोध नाही. तरीही या चित्रपटाविरोधात आंदोलने होत आहेत. या मानसिकतेला काय म्हणावे ? खरे म्हणजे विवेकाचा गळा घोटण्याच्या वृत्तीनेच मानव समूहाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची जाणीव निदान २१व्या शतकात तरी व्हायला हवी, असे कळकळीने वाटते. या चित्रपटात एक परग्रहस्थ मानव आकाशमार्गे पृथ्वीवर उतरतो. आपल्या निवासी परतण्यासाठी त्याच्याकडे एक रिमोट कंट्रोल आहे. पण, पहिल्याच अनुभवात पृथ्वीवरचा एक माणूस त्याचे रिमोट यंत्र खेचून पळून जातो. त्याच्या शोधात असतानाच त्याला पृथ्वीवरील माणसं, रितीरिवाज, देवदेवतांच्या कल्पना, येथील प्रश्न, आदी समजून घेण्याचा तो प्रयत्न करतो. त्याची पाटी कोरी आहे. त्याचमुळे जे जे प्रश्न त्याला पडतात त्याची बालकाच्या निरागसतेने उत्तरे मिळविण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या विक्षिप्त वाटणाऱ्या वर्तनाने त्याला ‘पीके’ (दारू ढोसून आलेला) असे नाव मिळते. प्रार्थनागृहाजवळील तसेच इतर माणसं म्हणतात, त्याचा रिमोट कुठे आहे. देवालाच माहीत. मग तो देवाचा शोध घेऊ लागतो. हा शोध सुरू असतानाच देवाशी संवाद असलेल्या तथाकथित गुरूशी त्याची गाठ पडते. त्यालाच तो रिमोटबद्दल विचारतो. समूहावर अधिराज्य असलेल्या गुरूच्या (बाबांच्या) उत्तरांनी त्याचे समाधान होत नाही. प्रत्यक्ष देवाला कॉल करून हे बाबा लोकांच्या समस्यांवर उपाय सांगतात. त्याचे फोलपण लक्षात आल्याने या असल्या कॉल्स्ना तो राँग नंबर ठरवतो. टीव्हीच्या माध्यमातून असे अनेक राँग नंबर्स उघडकीस येतात. बाबा आणि त्याचे भक्त चिडतात व देवालाच आव्हान असल्याच्या अविर्भावात देवाचे रक्षण करण्यासाठी सरसावतात. जो सर्वशक्तिमान आहे, त्याचे रक्षण करणे किती केविलवाणे ढोंग आहे, हे स्थापित करण्यात चित्रपट यशस्वी होतो. ‘पीके’ला बोलावे लागते ते ढोंगाची, फसवणुकीची आणि त्यातून होणाऱ्या पिळवणुकीची चिकित्सा करण्यासाठी. ‘पीके क्यूं बोला?’ याचे इतके साधेसुधे उत्तर आहे. सॉक्रेटीस, तुकाराम, फुले आणि दाभोळकर यांनी चिकित्साच केली म्हणून त्यांना भोगावे लागले. मात्र, पीकेला लोकाश्रय मिळाला आहे, हे समाजमन घडविण्याच्या कामी सूचिन्ह मानावे लागेल. तुकोबांनीच लिहून ठेवलंय : तुका म्हणे चला- घाव निशाणी घातला!(लेखक इंग्रजी भाषा व साहित्याचे प्राध्यापक आहेत.)