शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जो तो म्हणे...मला पण व्हायचंय ‘मेहरबान’

By admin | Updated: October 27, 2016 23:24 IST

पालिका निवडणूक : पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव; पक्ष, आघाडी कार्यालयात मुलाखतींना सुरुवात

कऱ्हाड : सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या व गरिबांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करून आशीर्वाद मिळवणाऱ्या प्रभागातील अनेक इच्छुकांना ‘मेहरबान’ होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळेच मागचा पुढचा विचार न करता सोबत असलेल्या शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मला पण व्हायचंय ‘मेहरबान’ असे म्हणत इच्छुक आपले उमेदवारी अर्ज भरत आहेत. कऱ्हाड पालिका निवडणुकीची दिवसेंदिवस रंगत अजूनच वाढत आहे. पक्ष, आघाडीतील विद्यमान नगरसेवकांकडून अद्यापही अर्ज भरले गेले नसल्याने अर्ज भरून आपणच ‘मेहरबान’ होऊ या, असे सांगत इच्छुकांकडून मात्र, अर्ज भरले जात आहेत. आॅनलाईनद्वारे अर्ज भरण्यास सांगितले असल्याने नवख्या इच्छुक उमेदवारांना ते सोपे जात आहे. त्यासाठी काहीजण रात्रीची वेळ निवडत आहेत. दिवसभर संबंधित विभाग प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या घेऊन अर्ज भरण्यासाठी रात्री शांत वातावरणाची वेळ निवडत आहेत. २९ प्रभाग असलेल्या व सुमारे ५७ हजारांहून अधिक मतदार असलेल्या कऱ्हाड पालिकेत जो-तो नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरू लागला आहे. पालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी इच्छुकांचा वाढता सहभाग विचारात घेता ‘मेहरबान’ही चिंताग्रस्त झाले आहेत. आपल्यासोबत कोण आणि आपल्या विरोधात कोण याबात अजूनही त्यांच्यात संभ्रमावस्ता आहे. मागील मेहरबानांनी काय कामे केली. आपल्याला एकदा संधी द्या मग काय करून दाखवतो, असे सांगत इच्छुक आपल्या शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांसह पालिकेत अर्ज भरण्यासाठी दाखल होत आहेत. अंगावर पांढरा खादी शर्ट आणि पांढरी पॅन्ट चढवून रूबाबात अर्ज भरण्यासाठी इच्छुक पालिकेत दाखल होत आहेत. अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस अवधी बाकी राहिल्याने इच्छुकांकडून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली जात आहे. अगोदर अर्ज तरी भरूया कोणत्या पक्षातून उभं राहायचं ते नंतर बघू, असे इच्छुक सांगत आहेत. (प्रतिनिधी) खादी शर्ट अन् हातात ब्रॅन्डेड मोबाईल ! गल्लीतील सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांची मने जिंकणाऱ्या ‘दादा’, ‘बाबा’ तसेच ‘भाई’ अशी ओळख असलेल्यांकडून आपला उमेदवारी अर्ज भरला जात आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार अंगावर खादी शर्ट अन् हातात ब्रॅन्डेड मोबाईल घेऊन शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पालिकेत येत आहेत. सायबर कॅफेत वाढली गर्दी कऱ्हाड पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडून चांगलीच गर्दी केली जात आहे. आॅनलाईनद्वारे अर्ज भरणे बंधनकारक असल्याने इच्छुकांकडून सायबर कॅफेत गर्दी केली जात आहे. त्यामुळे सायबर कॅफेवाल्यांचाही चांगला व्यवसाय होत आहे. रोज शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांसाठी चहा, नाष्टा इच्छुक उमेदवारांकडून आपल्यासोबत आपले कार्यकर्ते राहावेत म्हणून त्यांच्यासाठी चहा, नाष्ट्याचीही सोय करीत आहेत. तर काहीजणांकडून हॉटेल व धाब्यांवर जेवणेही दिली जात आहेत.