शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘माण’चा मानकरी कोण ठरणार

By admin | Updated: August 25, 2014 23:25 IST

रामराजे, शशिकांत शिंदे यांची परस्पर विधाने : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

सातारा : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची भाषा सुरू असतानाच सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचे प्रमुख शिलेदार असलेल्या मंत्री शशिकांत शिंदे आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी परस्पर विधाने करून माण आणि खटाव तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून सोडले आहे. परिणामी माण विधानसभा मतदारसंघात उमेदवारीचा मानकरी काँग्रेस की राष्ट्रवादी याकडे अनेकांच्या नजरा आहेत. विधानसभा निवडणुकांचा बिगुल आता वाजू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा चालू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आघाडी होणार असल्याचे स्पष्ट करतच जेथे विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे, अथवा ज्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे तो मतदारसंघ त्यांच्याकडेच राहणार, असे नमूद केले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीचे मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहतील, अशी घोेषणा करून नियोजन आयोगाचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अनेकांना कोड्यात टाकले आहे.मंत्री शिंदे यांची भूमिका लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील आठपैकी फक्त ‘कऱ्हाड दक्षिण’ आणि ‘माण-खटाव’ हे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असे स्पष्ट होते. गतवेळी माण राष्ट्रवादीकडे असताना येथून काँग्रेस बंडखोर जयकुमार गोरे, तर वाई काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादी बंडखोर मकरंद पाटील विजयी झाले. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ विजयी पक्षाकडे राहणार आहेत. दरम्यान, या दोघांच्या परस्परविरोधी वक्तव्याने राष्ट्रवादीतून इच्छुक असणारे आमदार प्रभाकर घार्गे, सदाशिवराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांच्यासह अनेक इच्छुक गोंधळात पडले असल्याची चर्चा माणच्या राजकीय पटलावर रंगली आहे. (प्रतिनिधी)माणची चर्चा सर्वाधिकसातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी सर्वाधिक आणि सर्वच पातळ्यांवर माण विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत माण-खटाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. मात्र, येथून जिल्हा परिषद सदस्य जयकुमार गोरे यांनी माणचे ‘किंगमेकर’ सदाशिवराव पोळ यांना धूळ चारत आमदारकी खेचून आणली होती. यानंतर गोरे यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. वाई मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र, येथून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी मदन भोसलेंचा पराभव केला. यानंतर पाटील यांनीही राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.