शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षपदाची लॉटरी कोणाला?

By admin | Updated: June 30, 2015 00:22 IST

‘कृष्णा’साठी निवडी शनिवारी : अध्यक्षपदी सुरेश भोसले निश्चित; उपाध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत

प्रमोद सुकरे -कऱ्हाड -नुकत्याच पार पडलेल्या यशवंतराव माहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा संत्तांतर झाले. डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने १५ जागा जिंकल्या आहेत. शनिवार, दि. ४ जुलै रोजी अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची निवडी होणार असून, डॉ. सुरेश भोसले यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जाते. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली. सत्ताधारी अविनाश मोहिते यांचे ‘संस्थापक’ पॅनेल, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे ‘रयत’ पॅनेल व डॉ. सुरेश भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल अशी लढत होऊन सहकार पॅनेलने १५ तर संस्थापक पॅनेलने ६ जागा मिळविल्या आहेत. सहकार पॅनेलचे नेतृत्वच डॉ. सुरेश भोसले यांनी केले असल्याने तेच कारखान्याचे पुन्हा एकदा अध्यक्ष होणार, हे निश्चित ! कारखान्याचे उपाध्यक्षपद हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. त्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी त्याची लॉटरी कोणाला लागणार, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. उपाध्यक्षपदासाठी कऱ्हाड तालुक्यात माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप व पंचायत समितीतील विरोधी पक्षनेते धोंडिराम जाधव यांची नावे चर्चेत आहेत. तर वाळवा तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य जितेंंद्र पाटील व सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांची नावे चर्चेेत आहेत. कारखान्याच्या इतिहासात अपवाद वगळता उपाध्यक्षपद वाळवा तालुक्याकडेच राहिले आहे. पण यावेळी पुन्हा एकदा नवा अपवाद होऊन उपाध्यक्षपदाची लॉटरी कऱ्हाड तालुक्याला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.४वाळवा तालुक्यातील भोसले गटाचे संचालक जितेंद्र पाटील हे दुसऱ्यांदा कारखान्यावर संचालक म्हणून निवडून आले आहेत. ते काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व जयंत पाटलांचे विरोधक म्हणूनच त्यांना ओळखले जाते. जयंत पाटील समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले आहे. वाळव्याचा विचार झाल्यास कोणाला पसंती मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर !कऱ्हाडला शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आॅगस्ट महिन्यात होऊ घातली आहे. ही निवडणूक नव्या मैत्रिपर्वाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका ‘दादा’ संचालकाला उपाध्यक्षपदाची संधी देऊन बाजार समितीच्या आखाड्यात एखादी चाल खेळली जाऊ शकते.