शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

साताऱ्याचा खासदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:04 IST

 सातारा । सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे ...

 सातारा । सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, बहुजन समाज पार्टीचे आनंदा थोरवडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दिलीप जगताप, सागर भिसे, शैलेंद्र वीर, अभिजित बिचुकले यांनी दंड थोपटले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उमेदवार कमी असल्याने प्रशासनाचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. साताºयाचा खासदार कोण असणार हे मतदारराजा आज ठरवणार आहे. उमेदवारांचे भविष्य आज मशीनबंद होणार आहे.मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झालीलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २३ एप्रिल रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अन्वये अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनामधील कर्मचाºयांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त यांनी कळविले आहे.अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.मतदार यादीतनाव कसे शोधाल?ँ३३स्र२://ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्लया संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्यालिंकवरील इलेक्ट्रोल सर्च इंजिनवर क्लिक करा.नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते.नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत.विधानसभा मतदार संघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.ँ३३स्र२://६६६.ल्ल५२स्र.्रल्लया संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च युजर नेम इन इलेक्ट्रोल रोलवर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल मे आपका स्वागत है, असे वाक्य झळकेल.मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.या माहितीची प्रिंटही काढता येते.मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे,नावात, पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाºयाची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधतायेते.काही गडबड झाली तर काय?शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या पाच ते सात मिनिटांत शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तत्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाºयांवर कडक कारवाई करेल. मंगळवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीस अधीक्षक (आयपीएस) ते पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.