शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात गरिबांना कुणी घर देता का घर..?

By admin | Updated: October 8, 2015 22:22 IST

दीडशे झोपडपट्टीधारक घरकूलच्या प्रतीक्षेत : नावावर असूनही मिळेना घर; स्थायी समितीच्या बैठकीकडे लक्ष, सहा इमारतींचे काम पूर्ण

कऱ्हाड : घर नावावर असूनही त्यामध्ये राहायला मिळत नसेल तर काय अवस्था होते, हे त्या घरमालकालाच माहीत. सध्या अशीच अवस्था कऱ्हाड येथील रुक्मिणीनगर झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या १५२ घरकूल लाभार्थ्यांची झाली आहे. गलिच्छ वस्तीत राहत असलेल्या रुक्मिणीनगरमधील झोपडपट्टीधारकांच्या नावावर घरकूल प्रकल्पातील खोल्या असूनदेखील निव्वळ स्थायी समितीच्या बैठकीअभावी व घोषणेअभावी त्यांना त्या खोल्या मिळू शकलेल्या नाहीत. नावावर खोल्या असूनही आपल्या हक्काच्या घरात राहायला मिळत नसल्याची परिस्थिती त्यांच्या नशिबी आली आहे. नगरसेवकांकडून महिन्यातून एकदा घेतल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.राज्यशासनाच्या घरकूल अभिनव योजनेतून कऱ्हाड पालिके ने कऱ्हाड ग्रामीणच्या हद्दीत असलेल्या जागेत हा प्रकल्प २००९ मध्ये उभा करण्यासाठी कार्यवाहीला सुरुवात केली. मात्र, त्यावेळी निधी कमी पडल्याने पुढे या प्रकल्पाचे काम रखडले. त्यानंतर कालांतराने प्रकल्पास निधी मिळाल्याने प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले. घरकूल प्रकल्पाचे काम सध्या पूर्ण झाले आहे. सध्या हा घरकूल प्रकल्प बारा डबरी परिसरात पूर्ण करण्यात आला असून, या ठिकाणी ६ इमारती बांधण्यात आल्या आहेत. तर या इमारतीमध्ये १५२ सुसज्ज अशा खोल्या देखील लाभार्थ्यांसाठी बांधण्यात आल्या आहेत. पालिकेतर्फे पात्र लाभार्थ्यांना ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये या घरकूल प्रकल्पातील खोल्यांचे वाटप करण्यात येणार होते. या सभेमध्ये लाभार्थ्यांच्या नावावर कोणती खोली देण्यात येणार, त्याबाबत निर्णय घेऊन त्याची घोषणा केली जाणार होती. मात्र, या मासिक सभेवेळी घरकूल वाटपाबाबतचा विषय बाजूला ठेवला गेला व इतर विषयांवरच चर्चा करण्यात आली. त्यामुळे सभेत १५२ झोपडपट्टीधारकांच्या घरकुलाचा प्रश्न प्रलंबित राहिला.तब्बल साडेआठ वर्षे काम सुरू असलेल्या घरकूलच्या सहा इमारती आता पूर्ण झाल्या असून, त्या शहरातील रुक्मिणीनगर येथील १५२ झोपडपट्टीधारकांना कधी मिळणार अशी विचारणा येथील लाभार्थ्यांकडून होत आहे. मात्र, याबाबत नगराध्यक्षांसह नगरसेवकही तत्काळ निर्णय घेत नाहीत. त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी येथील लाभार्थ्यांकडून केली जात आहे. सुमारे साडेतीन कोटी खर्च करून बाराडबरी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीशेजारी सहा इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. शहरातील ग्रामीण हद्दीत राहत असलेल्या गरीब लाभार्थी कुटुंबांचा पालिकेने २००९ मध्ये सर्व्हे केला होता. त्यातून १५२ लाभार्थ्यांची निवडही केली होती. २००९ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेतून निवडलेल्या लाभार्थ्यांना बाराडबरी परिसरात बांधण्यात येणाऱ्या घरकूल प्रकल्पाचा लाभ दिला जाणार हे त्यावेळी पालिकेकडून लाभार्थ्यांना सांगण्यात आले होते. पालिकेने २००९ मध्ये सुरू केलेल्या घरकूल प्रकल्पाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. एकूण १५२ खोल्या असलेल्या ६ इमारतींमध्ये १५२ लाभार्थ्यांना खोल्यांचे वाटप कधी करण्यात येणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी) पालिकेकडून बांधण्यात आलेल्या घरकूल प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये प्रकल्पासाठी १५२ लाभार्थ्यांची निवडही करण्यात आली आहे. मात्र, अजूनही स्थायी समितीची बैठक झाली नसल्याने लाभार्थ्यांच्या खोल्या वाटपाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.- प्रशांत रोडे, मुख्याधिकारी , नगरपालिका, कऱ्हाडफक्त प्रतीक्षा : लाभार्थ्यांना तारीख पे तारीख !गेली अनेक वर्षांपासून बाराडबरी, रुक्मिणीनगर या ठिकाणी असलेल्या अस्वच्छ वातावरण, दुर्गंधीचे साम्राज्य यातून लवकरच आपली सुटका होणार व आपल्या हक्काच्या घरकुलात आपण राहायला जाणार, या आशेने अजूनही लाभार्थी प्रतीक्षेत राहिले आहेत. मात्र, त्यांना दरवेळी फक्त नवीन तारीख ऐकावयास मिळत आहे. खोल्या अद्यापही रिकाम्याचपालिकेने शहरातील बाराडबरी परिसरात सुमारे साडेतीन कोटी खर्च करून ‘घरकूल प्रकल्प’ निर्माण केला आहे. या प्रकल्पात सहा इमारती असून, त्यामध्ये १५२ खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पातील खोल्या या लाभार्थ्यांना वाटपाविना मोकळ्या पडून राहिलेल्या आहेत.