शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी?

By admin | Updated: January 29, 2015 23:36 IST

संबंधितांवर दोन्हीही पक्षांनी शिस्तभंगाची कारवाई मात्र अद्यापही केलेली नाही.

म्हसवड/कुकुडवाड : म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेध पालिकेतील सत्ताधारी काँगे्रस पक्षास लागून राहिले आहे. विजय सिन्हा यांनी बुधवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त झाले आहे.आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. पालिकेची एकूण सदस्य संख्या १९ आहे. यामध्ये दोन स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे. सभागृहात काँग्रेस १६ व राष्ट्रवादी काँग्रेस तीन असे संख्या बलाबल आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे दोन व राष्ट्रवादी एक अशा तीन नगरसेवकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. संबंधितांवर दोन्हीही पक्षांनी शिस्तभंगाची कारवाई मात्र अद्यापही केलेली नाही. पालिकेचे नगराध्यक्ष पहिल्या अडीच वर्षांच्या कालखंडासाठी अनुसूचित जातीच्या महिलासाठी राखीव होते. सत्ताधारी गटातील वैशाली लोखंडे व प्रतिमा लोखंडे या दोन सदस्यांना विभागून नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटातील पुरुषासाठी राखीव आहे. त्याचा लाभ सर्वप्रथम विजय सिन्हा यांना देण्यात आला. नगराध्यक्षपदाचा लाभ अनेकांना मिळावा या हेतूने अडीच वर्षांच्या कालखंडात प्रत्येकी सहा महिन्यांचा कालावधी विभागून देऊन चार सदस्यांना नगराध्यक्षपदी संधी देण्याचा मानस आमदार जयकुमार गोरे यांचा आहे. (वार्ताहर)पाच उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू नितीन दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, मारुती वीरकर, निर्मला पिसे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. नितीन दोशी हे आमदार गोरे यांचे विश्वासू मानले जातात. अल्पसंख्यांक जैनधर्मियांना नगराध्यक्षपदाची संधी गेली साठ वर्षे मिळालेली नाही. यामुळे नितीन दोशी यांना आता प्रथम पसंती असेल. आमदार जयकुमार गोरे त्यांनाच नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी देतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असून इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.