शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गोरे बंधूत ‘सहकार संघर्ष’ टोकाला !

By admin | Updated: March 19, 2015 00:00 IST

सोसायट्यांच्या ठरावासाठी स्पर्धा : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी

म्हसवड : माण तालुक्यात सोसायट्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. आता माण तालुक्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व कोण मिळविणार, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. सध्या आमदार जयकुमार गोरे व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे या बंधूभोवती तालुक्याचे राजकारण फिरताना दिसत आहे. माणच्या सहकार क्षेत्रावर माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे वर्चस्व होते. पण २००७ नंतर त्यांच्या या करिष्म्याला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. त्यावेळी जयकुमार गोरे यांच्या रूपाने त्यांना विरोधक झाला. मागील पाच वर्षांत पोळ यांची ताकद आणखी कमी झाल्याचे जाणवले. त्यामुळे आमदार गोरे तालुक्याचे राजकारण पाहू लागले. असे असतानाच आता त्यांच्याविरोधात पोळ नाही तर त्यांचेच बंधू व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी आव्हान उभे केले आहे. शेखर गोरेंचे आव्हान सहजासहजी मोडून काढणे आमदार गोरेंना शक्यच नाही. त्यातच राष्ट्रवादीची ताकदही शेखर गोरेंच्या पाठीशी आहे. त्यामुळे माण तालुक्यातील सहकार व राजकीय क्षेत्रावर वर्चस्व ठेवण्यासाठी दोघां बंधूतच संघर्ष होताना पाहावयास मिळणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा बँक निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. कधी नव्हे इतका सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त सोसायटी आपल्या विचाराच्या व्हाव्यात, यासाठी आमदार गोरे व शेखर गोरे यांच्यात स्पर्धा आहे. पोळ हेही वर्चस्वासाठी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)भावांतच राहणार ठस्सल...तालुक्यात ७६ सोसायट्या आहेत. त्यापैकी ३० सोसायट्यांची निवडणूक लागली आहे. उर्वरित ४६ सोसायट्या कोणाच्या विचारांच्या आहेत, यावर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार ते ठरणार आहे. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व माजी अर्थ व शिक्षण समिती सभापती अ‍ॅड. भास्करराव गुंडगे कोणाला साथ देणार, याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकमात्र, सोसायटी निवडणुकीत गोरे बंधू एकास एक ठस्सल देत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर गुन्हे दाखल झाल्याचीही वेळ आली होती.सोसायटी निवडणुकीसाठी संघर्षपूर्ण वातावरण आहे. यावेळी जिल्हा बँक निवडणुकीसाठी उतरण्याची तयारी केली आहे. पण, यावेळी अधिक संघर्ष असल्याचे दिसत आहे.- सदाशिवराव पोळ, माजी आमदारसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मागील पंचवार्षिक निवडणूक माण तालुक्यात संघर्षपूर्ण झाली होती. त्यावेळी माणचे सर्वेसर्वा समजले जाणारे माजी आमदार सदाशिवराव पोळ यांना जयकुमार गोरे यांनी सोसायटी मतदारसंघातून जोरदार लढत दिली होती. त्यावेळी तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले होते. त्यानंतर गोरे यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक लढविली आणि पोळ यांचा पराभव केला.