शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यातील पैसा मुरला कोठे?

By admin | Updated: August 27, 2014 23:31 IST

शेखर गोरे : माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील मुंबईकरांचा कळंबोळीत मेळावा उत्साहात

म्हसवड : ‘माण महोत्सव भरवून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हा पैसा येतो कोठून याचाही विचार करण्याची गरज आहे. माण-खटाव तालुक्यांत साखळी सिमेंट बंधारे बांधले गेले. आघाडी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले; परंतु सिमेंट बंधाऱ्यांपैकी ८० टक्के बंधारे गळके आहेत. हा पैसा कुठे मुरला, याचाही विचार माण-खटावच्या जनतेने केला पाहिजे,’ असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी केले.कळंबोळी, नवी मुंबई येथे माणदेशी माणसांच्या मेळावा घेण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास उपस्थित मंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करत शेखर गोरे यांचे स्वागत केले.गोरे म्हणाले, ‘२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांना आमदार केले. ते दोन वर्षांत माण-खटावला पाणी आणले नाही तर राजीनामा देणार होते, दिला का राजीनामा? माण-खटाव तालुक्यांतील जे लोक मुंबईला कामाच्या शोधासाठी येतात. त्यांची राहण्याची व अंघोळीची सोय नसते. प्रसंगी त्यांना फूटपाथवर झोपण्याची वेळ येते. त्यासाठी मी माण-खटावच्या लोकांची सोय व्हावी, यासाठी दोन कोटी खर्च करून प्रशस्त ‘माण-खटाव भवन’ बांधून देण्याचा निर्धार केला आहे.’‘खासदार राजू शेट्टी बाहेरून येऊन शेतकऱ्यांना संघटित करून उसाला जादा दर मिळवून देत असले तर माण-खटावच्या पाणीप्रश्नासाठी जनतेचा रेटा उभा करून हा पाणीप्रश्न सोडवणार आहे. त्यावेळी तुम्ही मुंबईकरांच्या सहकार्याची गरज आहे. पाणीप्रश्नासाठी मी शासनास विनंती करणार आहे. तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी भू-संपादन केल्या आहेत. त्यांची भरपाई द्या. तांत्रिक अडचणी दूर करा, शंभर कोटी खर्चून माण-खटावला पाणी आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही,’ असेही शेखर गोरे यांनी आश्वासन दिले.गोरे म्हणाले, ‘माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील मुंबईकर मंडळी व तरुणांनी मला कळंबोली येथे बोलावून मेळावा घेतला. तो यशस्वीही झाला. मेळाव्यास अडीच ते तीन हजार माणदेशी मंडळी उपस्थित होते. याची विरोधकांनी मोबाइलवरून खातरजमाही केली आहे; पण आपल्या उपस्थितीमुळे माझ्या हितचिंतकांची तोंड बंद केले आहे.’ (प्रतिनिधी)