शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

महामार्गावरील ओरखडे कधी बुजवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

वेळे : आशियाई महामार्गावर पुणे ते सातारादरम्यान बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत ...

वेळे : आशियाई महामार्गावर पुणे ते सातारादरम्यान बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य तर काही ठिकाणी रस्त्यांवर ओरखडे ओढले गेले आहेत.

महामार्गावर जोशी विहीर ते पाचवडदरम्यान तब्बल वर्षापासून रस्त्यावर मारलेले ओरखडे अजूनही बुजवले गेले नाहीत. रस्त्यात अचानकपणे नजरेस पडणाऱ्या या ओरखड्यांची धास्ती सर्वच वाहनचालकांना वाटते. विशेषत: दुचाकीधारकांना तर विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्या ओरखड्यांमधून वाहन घसरून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

या ओरखड्यांमुळे वाहनधारकांमधून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. गाडीचे टायर लवकर खराब होणे, टायर फुटणे, गाडी घसरणे यासारख्या शक्यतांमुळे येथे अपघातजन्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तसेच यापूर्वी अनेकदा या ठिकाणी अपघातदेखील झाले आहेत. हे ओरखडे उड्डाणपुलावर असल्याने पुलाच्या कणखरतेचाही प्रश्न पुढे आला आहे. गेल्या वर्षभरापासून पडलेल्या ओरखड्यांमुळे या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना दुचाकीवरून जाताना भीती वाटू लागली आहे. येथील रस्त्याचे काम पूर्णत्वास नेऊन वाहनचालकांना दिलासा मिळावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. या रस्त्याच्या ठेकेदाराने हे काम त्वरित पूर्ण करून येथील अपघात रोखण्यासाठी मदत करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

फोटो..

१८वेळे

आशियाई महामार्गावर पुणे ते सातारादरम्यान बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.