शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

एक फरवरी कब आयेगी ?

By admin | Updated: January 29, 2015 00:09 IST

सखींना उत्सुकता : करमणुकीच्या कार्यक्रमांना तर प्रत्येकीलाच यायचंय बरं का...

सातारा : ‘लोकमत सखी मंच सदस्य झाल्यास दरवर्षी लावण्यांचा भन्नाट कार्यक्रम... हळदी-कूंकूचा कार्यक्रम अन् आकर्षक वाण लुटायचं.. एवढच नाही तर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीलाही जाता येते,’ हे मैत्रिणींकडून ऐकल्यामुळे नव्याने सदस्य होणार असलेल्या सखींमध्ये हुरहूर लागली आहे. सभासद सगळींनाच व्हायचं आहे, पण केवळ १ फेबु्रवारीलाच सदस्य होता येणार असल्यानं ‘१ फरवरी कब आयेगी?’ अशीच चर्चा सखींमध्ये सुरू झाली आहे. अनेक वर्षे सखींच्या अंत:करणाशी जोडल्या गेलेल्या ‘लोकमत सखी मंच’चे नववर्षात दिमाखदार पदार्पण होत आहे. तब्बल तेरा वर्षांची यशस्वी कारकीर्द असणारे सखी मंच म्हणजे असंख्य सखींनी मिळविलेले एक मुक्त आकाश. जिथं प्रत्येक सखीने अनुभवले आहेत अनेक अविस्मरणीय क्षण. १ फेब्रुवारीला सखी मंच २०१५ ची एक दिवसीय सदस्य नोंदणी होणार आहे. सातारा शहरात अनंत इंग्लिश स्कूल (राजवाड्याजवळ), जिजामाता ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशन (कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका) आणि अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (जिल्हा परिषदेजवळ) या तीन ठिकाणी एकाच वेळी सकाळी नऊ वाजल्यापासून सखी मंचची सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्यांना लकी ड्रॉमधून १८,५०० रुपयांची आटाचक्की अनंत ट्रेडिंग कंपनीमार्फत, माऊली सोफाज्मार्फत २१ हजार रुपये किमतीचा आकर्षक सोफा सेट जिंकण्याची संधीही मिळणार आहे. सोबतच प्रत्येक सखीला सुमुखी ब्युटी पार्लरमार्फत २५० रुपयांचे फेस क्लिनअप मोफत मिळणार आहे. लावणी महोत्सव ८ फेबु्रवारीला होणार असून, याचे स्थळ लवकरच जाहीर केले जाणार आहे. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमात देखील बक्षिसांची लयलूट होणार आहे. तीन भाग्यवान सखींना कास हॉलिडे रिसॉर्टमध्ये कुटुुंबातील तीन व्यक्तींसह एक दिवस मोफत राहता येणार आहे. याअंतर्गत ७,००० किमतीच्या सुविधा (चहा, नाष्टा, जेवण, राहणे) मोफत मिळणार आहे. तीन भाग्यवान सखींना सातारा बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रामध्ये एक दिवसाचे पॅकेज, एन्ट्री फी, चहा, नाष्टा, जेवण मोफत मिळणार आहेच, शिवाय प्रत्येक सदस्याला तिच्या कुटुंबीयांसह प्रत्येकी ५० रुपयांची सवलत दिली जाणार आहे. भाग्यवान सखींनी एस. एस. एंटरप्रायजेसमार्फत दोन इलेक्ट्रॉनिक्स इस्त्री जिंकता येणार आहेत आणि दहा भाग्यवान सखींना हॉटेल सुर्वेज्मार्फत २०० रुपयांचे मोफत लंच किंवा डिनर मिळणार आहे. वर्षभर होणाऱ्या बिलावर दहा टक्के सवलतही मिळणार आहे. (प्रतिनिधी)१ फेब्रुवारीला प्रत्येकीला मिळणार हमखास बक्षीसनव्या-जुन्या सर्व सभासदांसाठी नोंदणी शुल्क नेहमीप्रमाणेच फक्त ३५० रुपये आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी प्रत्येक सभासदांना ५०० रुपये किमतीच्या हमखास गिफ्ट, सोबत १०० रुपये किमतीचे ‘माय डाएट बुक’ आणि सुवणस्पर्श, जेम्स अँड ज्वेलर्स मार्फत तब्बल १,१०० रुपये किमतीच्या बँगल्स मिळणार आहेत. कऱ्हाडची एक दिवशीय सदस्य नोंदणी रविवार, दि. १५ फेबु्रवारीला होणार आहे. अर्ज कऱ्हाड शहरातील ‘लोकमत’ कार्यालय आणि कमिटी मेंबर्सकडे उपलब्ध आहेत.हळदी-कुंकवाचे आकर्षक वाणदेखील जिजाऊ प्रतिष्ठानमार्फत प्रत्येक सभासदाला मिळणार आहे. नोंदणी फॉर्म सातारा येथील ‘लोकमत’ कार्यालयात आणि सर्व कमिटी मेंबर्सकडे उपलब्ध आहेत.