शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पण स्मारक कधी?----‘जीवा’ची बाजी...

By admin | Updated: December 19, 2014 23:33 IST

अशासकीय सदस्यांची मागणी : समिती सदस्यांसह अखिल भारतीय जीवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांशी भेट

सातारा : ‘हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत मोलाचे योगदाने देणारे वीर जीवा महाले यांचे स्मारक लवकरात लवकर उभे राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित शासकीय अधिकारी तसेच समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी वीर जीवा महाले स्मारक समितीतील अशासकीय सदस्य अशोक जाधव यांनी केली आहे.प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाच्या वधाच्या वेळी सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला होता. हा वार अलगद झेलणारे जीवा महाले यांचा पराक्रम मोठा आहे. या शूरवीराचे स्मारक उभारावे यासाठी ‘लोकमत’ने ‘जीवा’ची बाजी; पण स्मारक कधी? ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. शासनाने स्थापन केलेल्या वीर जीवा महाले स्मारक समितीतील अशासकीय सदस्य तसेच अखिल भारतीय जीवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रतापगड पायथ्याला असलेल्या नवीन जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर तहसील कार्यालयात भेट दिली.यावेळी स्मारक समितीतील अशासकीय सदस्य अशोक जाधव म्हणाले, ‘वीर जीवा महाले यांच्या प्रलंबित स्मारकासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. केवळ जागा निश्चितीअभावी ते रखडत चालले आहे. याची जबाबदारी प्रशासनाला टाळता येणार नाही. प्रतापगडाच्या पायथ्याला वाडा कुंभरोशी येथे सुचविलेल्या सोळा गुंठे जागेत स्मारक करायला हरकत नाही; पण हा निर्णय लवकरात लवकर लावण्यात यावा.’यावेळी समितीतील दुसरे अशासकीय सदस्य जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धोंडिराम जाधव, अखिल भारतीय जीवा सेनेचे सदस्य बंटी शेळके, कृष्णाजी निमगले, राकेश क्षीरसागर, पद्माकर जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाभिक संघटनेकडून ‘लोकमत’चे आभारवीर जीवा महाले यांचे स्मारक व्हायलाच हवे, या मागणीसाठी ‘लोकमत’ने ‘जीवा’ची बाजी; पण स्मारक कधी’ ही वृत्त मालिका प्रसिद्ध केली. या मालिकेनंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत,’ अशा शब्दांत सातारा येथील नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ दळवी यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. यावेळी जिल्ह्यातील सर्वच सलून दुकानात ‘लोकमत’ ग्राहकांना वाचनासाठी ठेवला जाईल, असेही ते म्हणाले. ४यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जाधव, संतोष साळुंखे, शैलेश सावंत, चंद्रकांत इंगळे, अरुण खैरे, तानाजी जाधव, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. सातारा येथील ‘लोकमत’ कार्यालयात नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी संतोष साळुंखे व भाऊ दळवी यांनी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.