शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील दीड लाख बेरोजगारांना नोकऱ्या कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:40 IST

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल दीड लाख युवक-युवती बेरोजगार आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल दीड लाख युवक-युवती बेरोजगार आहेत. त्यांच्या भविष्याबाबत काय धोरण आखणार आहे? असा प्रश्न भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाने उपस्थित केला असून, सरकारी नोकºया तत्काळ सुरु कराव्यात, या प्रमुख मागणीसह इतर १० मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विविध संघटनांच्या वतीने चक्री उपोषण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करणारे कार्यालय आहे, त्यात बेकारांची ८० हजार इतकी संख्या नोंदणीकृत आहे. नोंदकृत नसणारे बेकारांची संख्या मिळालेल्या माहितीनुसार ७० हजार इतकी आहे. या युवक-युवतींच्या भविष्याचे काय? याचे उत्तर मिळाले पाहिजे. सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे, अशी खंत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यापुढे व्यक्त करण्यात आली.

सरकारी नोकरांच्या पेन्शन २००५ पासून सर्वांना सुरू करावी, भटके विमुक्त, धनगर, वंजारी व विशेष मागास प्रवर्ग यांचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, कंत्राटी पद्धती बंद करावी, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी खासगीकरण केलेल्या सर्व उद्योगधंद्यांना, सेवा उद्योगांना लागू करावी, खासगी सेवा उद्योगातील कर्मचाºयांना कायद्याने संरक्षण द्या, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष प्रवर्ग सहकारी संस्थांचे खासगीकरण थांबवा व तिथे तत्काळ नोकर भरती सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, त्या केल्या नाहीत तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण माने, दगडू सस्ते, नेताजी गुरव, बाळासाहेब शिरसाट, दादासाहेब ओव्हाळ, भालचंद्र माळी, मच्छिंद्र जाधव यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले.नोटाबंदी निर्णयात जनता अंधारातनोटाबंदीचा निर्णय घेताना जनतेला विश्वासात घेतले नाही. बेकारी, बेरोजगारी, गरिबी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, शिक्षण मोफत नाही, कर्ज काढून शिक्षण घ्यायचे आणि बेरोजगार व्हायचे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.