शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

‘केव्हा तरी पहाटे’ने घेतला रसिकांच्या मनाचा ठाव

By admin | Updated: October 23, 2014 22:53 IST

रसिक चिंब: गांधी मैदानावर रंगली गीतांची अविट मैफिल

सातारा : दिवाळीची पहिली पहाट सुरमय करून सातारकरांना आनंद देणाऱ्या ‘केव्हा तरी पहाटे’ या कार्यक्रमाचा दहावा अध्याय गांधी मैदानावर गायला गेला. अवीट गाण्यांनी बुधवारी सातारकर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या कार्यक्रमाची सुरुवात गायक अमोल बावडेकर, नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राज्य वाहतूकदार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी, नगरसेवक निशांत पाटील, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद सारडा, दिलीप गवळी, अ‍ॅड. मुकुंद सारडा, सलीम कच्छी, धनंजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती.अमोल बावडेकर यांच्या ‘ओंकार स्वरुपा तुज नमो’ या गणेश स्तुतीने आरंभ झाला. जुन्या, नव्या मराठी गाण्यांचा हा नजराणा सादर होताना सातारकरांनी आपला पायात ठेका धरला होता. राजन घोणे, पूर्णिमा भावसार आंग्यले, साथीला सांगलीचे प्रसाद लिमये यांनी हा कार्यक्रम उंचीवर नेला. अलका सावंत यांच्या ‘केव्हा तरी पहाटे’ या शिर्षक गीतानंतर दिवाळीचे गाणे अर्थात ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’हे गीत पूर्णिमा यांनी सादर केले. पं. जितेंद्र अभिषेकींचा जादुई स्वर लाभलेले कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर हे गीत अमोल बावडेकर यांनी सादर केले. हा गाण्याचा प्रवास पुढे सुरू राहात राजन घोणे यांचे आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, शूर आम्ही सरदार, दूर किनारा राहिला सादर होऊन परिकथेतील राजकुमारा, घरकुल चित्रपटातील मलमली तारुण्य माझे, प्रेमाला उपमा नाही, धुंदी कळ्यांना, पाहिले न मी तुला, श्रीरंग गोडबोले यांचे मुंबई-पुणे मुंबई चित्रपटातील ‘नवे कधी तू’ हे गीत प्रसाद लिमये यांच्याकडून सादर झाले. त्यानंतर हा सागरी, येशील राणी या गीतांच्या सादरीकरणानंतर थोडी वेगळी वाट चोखाळत ढोलकीच्या ठेक्यावर लावणीचा रंग भरत ‘या रावजी बसा भावजी’ सादर झाली.कार्यक्रमात गायकांबरोबरच संगीत साथ करणारे दीपक सोनावणे, धनंजय कान्हेरे, शांताराम दयाळ, बासरीवादक रसुली मुलाणी, सचिन कवितके, केदार गुळवणी, किरण ठाणेदार, रमाकांत पालेकर, राजेश हेमंत, ध्वनी संयोजक नंदकुमार सव्वाशे यांचा सत्कार कंदी पेढे देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दलही अ‍ॅड. बाबर यांचा सातारकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सातारचा एक पॅटर्न झाल्याचे गौरवोद्गार अ‍ॅड. मुकुंद सारडा यांनी काढले. (प्रतिनिधी)