शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राणीसाहेबांच्या साम्राज्यात काय वर्णावा महिलांचा थाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:50 IST

सातारा : मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया साताºयात लढवय्या सैनिकांची परंपरा तशी खूप जुनी. ढाल अन् तलवारींचा इतिहासही अजिंक्यताºयाच्या पायथ्याशी अनेक शतकांपासून लिहिला गेलेला; परंतु गेल्या काही महिन्यांपासून या साताºयात ‘महिला राज’ सुरू झाल्याचं स्पष्टपणे जाणवू लागलंय. ‘राणीसाहेबांच्या साम्राज्यात काय वर्णावा महिलांचा थाट?’ असंही मोठ्या कौतुकानं जुन्या-जाणत्या पेठांमध्ये विचारलं जावू लागलंय.

सातारा : मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया साताºयात लढवय्या सैनिकांची परंपरा तशी खूप जुनी. ढाल अन् तलवारींचा इतिहासही अजिंक्यताºयाच्या पायथ्याशी अनेक शतकांपासून लिहिला गेलेला; परंतु गेल्या काही महिन्यांपासून या साताºयात ‘महिला राज’ सुरू झाल्याचं स्पष्टपणे जाणवू लागलंय. ‘राणीसाहेबांच्या साम्राज्यात काय वर्णावा महिलांचा थाट?’ असंही मोठ्या कौतुकानं जुन्या-जाणत्या पेठांमध्ये विचारलं जावू लागलंय. 

त्याचं असं झालं की सातारा पालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी यंदा शाहू कला मंदिरात सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आलेला. याचं उद्घाटन दिपप्रज्वलनानं झालं, तेव्हा व्यासपीठावरची गर्दी पाहून समोरचे प्रेक्षकही क्षणभर चाट पडले; कारण उपनगराध्यक्ष राजू भोसले वगळता वर साºया महिलाच महिला. अबब... त्याही किती म्हणाव्यात... तब्बल अकरा ! 

बिच्चारे एकटे उपनगराध्यक्ष मात्र, या सर्व महिलांच्या गराड्यात स्वत:ला आक्रसून घेताना पाहून प्रेक्षकांचं भलतंच मनोरंजन झालं. नगराध्यक्षा माधवी कदम, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता फाळके यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेविका या कार्यक्रमात मोठ्या हिरीरीनं पुढाकार घेत होत्या. विशेष म्हणजे, सातारा विकास आघाडीनं यंदा प्रथमच स्मिता घोडके यांच्या रूपातून एका महिलेला पक्ष प्रतोद पदाची जबाबदारी दिलीय. 

गेल्यावर्षी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आल्यानंतर पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचं कार्य उदयनराजेंच्या पत्नी स्वत: दमयंतीराजे भोसले करीत आहेत. तसंच ‘जलमंदिर’मधून खुद्द राजमाता कल्पनाराजे भोसले याही पालिकेच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवून. त्यामुळंच की काय, सातारा पालिकेमध्ये ‘राणीसाहेबांच्या साम्राज्यात काय वर्णावा महिलांचा थाट?’ असा सवाल सारेच पुरूष खाजगीत एकमेकांना विचारू लागलेत.