सातारा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जे अधिकारी व कर्मचारी नेमले जातात, त्यांना मानधनच मिळत नसल्याचे चित्र आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या अल्प निधीमध्येच काटकसर करुन महसूल विभागाला खर्च करावा लागतो, त्यात कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन काय असते रे भाऊ! असा प्रश्न पडतोय.
सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. यासाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व शिक्षक असे कर्मचारी यांना सेवेत घेण्यात आले होते. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निवडणुकीसाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने तत्काळ मानधनाचे वाटप केले जाते, त्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकीत होत नाही. कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा लागते.
ग्रामविकास विभागाने सातारा जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी १0 हजार रुपये निधी खर्चासाठी महसूल विभागाला दिला. निवडणुकीत खर्च करताना प्राधान्य ठरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वाहतूक, स्टेशनरी, मतदान साहित्य, यासाठी खर्च करण्यावर भर दिला जातो. आता कोविडमुळे ऑक्सिमिटर, सॅनिटायझर, मास्क याचा खर्च वाढलेला आहे. मिळालेल्या निधीतूनच महसूल विभागाने काटकसर करुन हा खर्च भागवला आहे. मात्र निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना कोणतेही मानधन मिळालेले नाही. एवढंच काय तर यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील मानधनही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही.
जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : ८७८
किती केंद्रांवर झाली निवडणूक
२०३८
अधिकारी किती
२७६०
कर्मचारी किती
१७४२९
मानधनच ठरलेले नाही
ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मचाऱ्यांना किती मानधन द्यायचे, याबाबतचा निर्णय तहसील स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार असले तरी मानधन मिळेलच याची या कर्मचाऱ्यांना खात्री नाही.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कोट
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाकडून जो निधी मिळतो. त्यातून प्राधान्याने वाहतूक, प्रिंटिंंग, स्टेशनरी, मतदान साहित्य यासाठी खर्च करण्यावर प्राधान्य दिले जाते. उपलब्ध निधीव्यतिरिक्त आणखी निधी मिळाला तरच कर्मचाऱ्यांना मानधन देता येईल.
- कीर्ती नलावडे, निवडणूक निर्णय अधिकारी
चौकट..
मागील निवडणुकीतील मानधनच नाही
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षकांना सामावून घेण्यात आले होते. मात्र त्यांना कुठल्याही पद्धतीचे मानधन देण्यात आलेले नाही.
चौकट..
केवळ विधानसभा, लोकसभेलाच मिळाले
ग्रामपंचायत निवडणुकीत अधिकारी कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नसले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधासभा व लोकसभा निवडणुकीत मानधन दिले जाते. मतदान अथवा मतमोजणी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना तत्काळ मानधनाचे वाटप केले जाते.
फोटो सेव आहेत.
25 रेम्युनरेशन इलेक्शन वर्क